निवृत्त परिचारिकेसोबत जाऊन ३० लाख रुपये काढले, साथीदाराचे डोळे फिरले, कारमध्ये बसवलं अन्…

Jalgaon Crime News: चुंबळे या साळवा तालुका धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या एप्रिल २०२३मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा समीर देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या.

हायलाइट्स:

  • बँकेतून ३० लाख रोख काढले
  • सोबत असलेल्या सहकाऱ्यानेच हत्या केली
  • जळगावमध्ये महिलेची हत्या करत मृतदेह तापीत फेकला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महिलेची हत्या करुन मृतदेह तापीत फेकला
निलेश पाटील, जळगाव : सेवानिवृत्त परिचारिकेने बँकेतून ३० लाखाची रोख रक्कम काढली. सोबत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला गाडीत बसवले आणि महिलेचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर शिरपूर तालुक्यातील सावर्डे येथील तापी नदीच्या पुलावरून नदीत महिलेचा मृतदेह फेकला. ही धक्कादायक घटना काल मंगळवारी उघडकीस आली आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबाळे (वय ६०, रा. खोटे नगर, जळगाव) यांचा ३० लाखांच्या रकमेसाठी खून करून मृतदेह तापी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांना ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे.
Share Market Down: 3 लाख कोटी पाण्यात… सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेपुढे मंदीचा धोका, शेअर बाजाराची पुन्हा निसरडी पायवाट

सदर महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी महिलेकडून लुटलेले ३० लाख रुपये तसेच ज्या चारचाकी वाहनामध्ये त्या महिलेचा खून केल्याचा संशय आहे, ती चारचाकी देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चुंबळे या साळवा तालुका धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या एप्रिल २०२३मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा समीर देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या. १७ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभेसाठी त्या जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्ट रोजी त्यांनी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पती संजय देशमुख यांना फोन करून रात्री नाशिक स्टेशनवर घ्यायला येण्यास सांगितले. मात्र, त्या रात्री पोहोचल्या नाहीत. दोन दिवस शोध घेतल्यावर त्यांच्या मुलाने जळगाव तालुका पोलीस ठाण्याला २२ ऑगस्ट रोजी हरवल्याची तक्रार नोंदवली.

महिलेचं लोकेशन पारोळापर्यंत

पोलिसांनी संबंधित महिलेच्या लोकेशनची माहिती घेतली. त्यात २० ऑगस्ट रोजी पारोळापर्यंतचे लोकेशन आढळून आले. त्यानंतर मात्र लोकेशन दिसून येत नाही. त्यामुळे महिलेचा मोबाईल हा पारोळ्यात फेकला की मग तेव्हाही महिलेलाही पारोळात आणले होते का? याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
Today Top 10 Headlines in Marathi: संपामुळे लालपरीची चाकं थांबली, लाडक्या बहिणीची ओवाळणी कशी लांबवली? सकाळच्या दहा हेडलाईन्स

महिलेचा मृतदेह मात्र सापडेना

पोलिसांच्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यासाठी महिलेला ३० लाख रुपये काढायचे होते. हे सोबत असलेल्या जिजाबराव पाटील याला माहिती होते. सोबतच कामाला असल्याने महिलेसोबत तो पैसे काढायला गेला होता. फ्लॅट घेताना कॅश रक्कम दिली तर फ्लॅट कमीमध्ये मिळेल असं सांगत जिजाबराव याने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या पैशांसाठी महिलेचा खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह तापी नदीत फेकून दिला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयतांनी महिलेसोबत रिंग रोडवरील बँकेतून ३० लाखाची रक्कम काढल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर महिलेला घरी सोडले नाही तर गाडीतच महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरून नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पोलीस पोहोचले संशयितापर्यंत

मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेला नाशिकला फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी ३० लाखाची रक्कम २० ऑगस्ट रोजी रिंग रोडवरील बँकेतून काढली होती. याच माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये स्नेहलता यांच्यासोबत जिजाबराव पाटील हे आढळून आले. जिजाबराव हे साळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिकाचे काम करतात. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता स्नेहलता चुंबळे यांना खोटे नगर स्टॉपजवळ सोडल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यानंतर जिजाबराव पाटीलचे फोन कॉल डिटेल्स तपासले. त्यातून जिजाबरावने विजय निकम याच्याशी सर्वाधिक संपर्क केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

female nurse murder body thrown tapri riverjalgaon crime newsretired female nurse murderक्राइम बातम्याजळगाव क्राइम बातम्याजळगाव पोलीसमहिलेची हत्या करुन मृतदेह तापीत फेकला
Comments (0)
Add Comment