आजचे पंचांग 6 सप्टेंबर 2024: श्री हरितालिका पूजन, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १५ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल तृतीया दुपारी ३-०० पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त सकाळी ९-२४ पर्यंत, चंद्रराशी: कन्या रात्री १०-५९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद १५, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल तृतीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर भाद्रपद मास प्रविष्टे २२, रब्बी उल्लावल ०२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. तृतीया तिथी दुपारी ३ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ,

हस्त नक्षत्र सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग रात्री १० वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, गर करण दुपारी ३ वाजून २ मिनिटांपर्यत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून १ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुळ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२६
  • सूर्यास्त: सायं. ६-४८
  • चंद्रोदय: सकाळी ८-४९
  • चंद्रास्त: रात्री ८-४२

  • पूर्ण भरती: दुपारी १-३६ पाण्याची उंची ४.०८ मीटर, उत्तररात्री १-५८ पाण्याची उंची ४.०३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०१ पाण्याची उंची १.२६ मीटर, सायं. ७-३६ पाण्याची उंची ०.८७ मीटर
  • व्रत आणि सण : हरितालिका तृतीया, गौरी तृतीया, श्री वराह जयंती, कलंक चतुर्थी (चंद्र दर्शन-निषीद्ध )

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी साडे चार ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटांपासून ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपासून ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आज महादेव आणि पार्वती मातेची मनोभावे आणि विधीवत पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

6 september daily panchang6 सप्टेंबर दिनविशेष6 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगहरितालिका पूजन marathi panchang
Comments (0)
Add Comment