RSS Chief Mohan Bhagwat News: मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं की, कुणीही स्वत:ला देव असल्याचं घोषित करु शकत नाही. यावेळी त्यांचा नेमका इशारा कोणाकडे होता?

आपण जास्तीत जास्त चांगली कामं करायला हवी, पण आपण देव आहोत याची घोषणा आपण करु नये – भागवत
भैय्याजी काणे यांच्या कार्याचे स्मरण करून भागवत म्हणाले, “आपण आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही असे म्हणत नाही की आपण चमकू नये किंवा वेगळे दिसू नये. प्रत्येकजण आपल्या कामातून आदरणीय व्यक्ती बनू शकते, परंतु आपण त्या स्तरावर पोहोचलो आहोत की नाही हे आपण स्वत: ठरवू शकत नाही तर ते इतरांनी ठरवावे. आपण याची घोषणा करु शकत नाही की आपण देव झालो आहे”, असं मोहन भागवत म्हणाले.
मणिपूरमधील परिस्थितीबाबत भागवतांकडून चिंता व्यक्त
मणिपूरमधील परिस्थितीबाबत बोलताना संघ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. संघाचे स्वयंसेवकांनी मणिपूर सोडले नाही, तसेच काही करत नाहीये असंही नाही, यावर भागवत यांनी भर दिला. ते मणिपूरची स्थिती सामान्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवण्यासाठी दोन गटांमधील तणाव कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.
Mohan Bhagwat: देव झालो असं स्वतः म्हणू नये, मोहन भागवतांनी कान टोचले, कोणाकडे इशारा?
तिथे सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिक लोकांमध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत साशंकता आहे. जे लोक तेथे व्यवसाय किंवा सामाजिक कार्यासाठी गेले आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे. परंतु अशा परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक तैनात आहेत. आम्ही दोन्ही गटांना सेवा देत आहोत आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही मोहन भागवत म्हणाले.