Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांसोबत युती करुन चूक केली का असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या.
अजित पवार यांच्यासोबत युती करुन चूक केली का?
नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्हला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महायुती, अजित पवार, विधानसभा निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार यांच्यासोबत युती करुन चूक केली का? असा सवालही त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत ही काळाची गरज होती असं म्हणत इतरही अनेक मुद्दे मांडले.
‘…काळाची गरज होती’
‘अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली हे असं म्हणणार नाही, काळाची गरज होती, त्यामुळे काळाची गरज असताना संधी आली, तर सोडायची नसते’, असं ते म्हणाले. अजित दादांना महायुतीतून वगळणार नाही, लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभेला एकत्र आहोत. अजित पवार ४० वर्ष राजकारणात आहेत. ते आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. त्यांना असं कधी पाहिलं होतं का? पण आता ते गेले. त्यांना काही गुण आमचे लागणार. त्यामुळे काळजी करू नका, स्थिर – स्थावर होण्यासाठी वेळ लागतो, त्याचा फायदा होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अधिकृत प्रवक्ते जाहीर होतील, ते बोलतील तेच अधिकृत असेल…
दादांची कोणतीही एक्झिट नाही, आम्ही सर्व लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी एकत्र राहणार असून मित्र पक्षही सोबत असणार आहेत. आता लवकरच तीन पक्षांचे अधिकृत प्रवक्ते जाहीर करण्यात येणार आहेत. ते बोलतील तेच अधिकृत असेल, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.