आजचे पंचांग 7 सप्टेंबर 2024: श्रीगणेश चतुर्थी, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

शनिवार ७ सप्टेंबर २०२४,भारतीय सौर १६ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्थी सायं. ५-३६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: चित्रा दुपारी १२-३३ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद १६, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्थी, शनिवार,विक्रम संवत २०८१ सौर भाद्रपद मास प्रविष्टे २३, रब्बी उल्लावल ०३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ.

हस्त नक्षत्र दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपासून त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग रात्री ११ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२६
  • सूर्यास्त: सायं. ६-४७
  • चंद्रोदय: सकाळी ९-३७
  • चंद्रास्त: रात्री ९-१५

  • पूर्ण भरती: दुपारी २-०२ पाण्याची उंची ३.९४ मीटर, उत्तररात्री २-३० पाण्याची उंची ३.९३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२८ पाण्याची उंची १.४९ मीटर, सायं. ७-५९ पाण्याची उंची ०.८८ मीटर
  • सण आणि व्रत: श्रीगणेश चतुर्थी, सिद्धि विनायक व्रत, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, जैन संवत्सरी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपासून ६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आज गणपती बाप्पाची विधीवत पूजा करून मोदकाचा नैवेद्य अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

7 september daily panchang7 सप्टेंबर दिनविशेष7 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगश्रीगणेश चतुर्थी
Comments (0)
Add Comment