Nanded News: दहीहंडी कार्यक्रमात दोघांमध्ये वाद, दुसऱ्या दिवशी वाद मिटवण्यासाठी आले, पण भलतंच घडलं

Nanded Crime News: गुरुवारी रात्री कृष्णा मुळे या युवकाचे दहीहंडी मध्ये नाचताना धक्का लागल्याने अंकुश इंगोले सोबत भांडण झाले होते. इतर तरुणांनी वाद मिटवले.

हायलाइट्स:

  • अभिनेत्री माधुरी पवार हजर असलेल्या कार्यक्रमात वाद
  • दुसऱ्या दिवशी वाद मिटवण्यासाठी एकत्र आले
  • वाद मिटण्याऐवजी भलतचं घडलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अभिनेत्री माधुरी पवार दहीहंडी कार्यक्रम वाद
अर्जुन राठोड, नांदेड : सद्या दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाला सेलिब्रिटीला बोलावले जातं आहेत. सेलिब्रेटींना पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. गुरुवारी रात्री नांदेड शहरातील चैतन्य नगर परिसरात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी पवार हिने हजेरी लावली होती. यावेळी दोन तरुणांमध्ये नाच-गाण्यावरून वाद झाला आणि दुसऱ्या दिवशी हा वाद मिटण्याऐवजी याचं रूपातंर हत्येत झालं. भांडण समेटाच्या बैठकीत चाकूने छातीत वार करून वैभव दुधाटे या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आरोपी अंकुश इंगोले याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री कृष्णा मुळे या युवकाचे दहीहंडी मध्ये नाचताना धक्का लागल्याने अंकुश इंगोले सोबत भांडण झाले होते. इतर तरुणांनी वाद मिटवले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दुपारी हा वाद मिटवण्यासाठी कृष्णा मुळेसोबत त्याचा मित्र वैभव दुधाटे आला तर आरोपी अंकुश इंगोलेसोबत त्याचा मित्र योगेश चौधरी आला. राज कॉर्नर येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये चौघेजण बसले होते. मात्र त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हॉटेलमध्ये भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर हॉटेल बाहेर येऊन कृष्णा मुळे आणि वैभव दुधाटे यांनी अंकुशला मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात आरोपीने हॉटेलमधील चाकू घेऊन वैभवच्या छातीत वार केले तसेच कृष्णाला देखील जखमी केले. रक्तभंबाळ झालेल्या वैभव दुधाटे याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.

भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेनं मात्र दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. कार्तिका यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी अंकुश इंगोले याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Nanded crime newsNanded policenanded youth killedअभिनेत्री माधुरी पवार दहीहंडी कार्यक्रम वादनांदेड क्राइम बातम्यानांदेड तरुणाची हत्यानांदेड पोलीस
Comments (0)
Add Comment