Pune Indapur Truck Driver Video: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.
हायलाइट्स:
- पुणे इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार
- नशेत कंनटेर चालवत केले कारसह हॉटेलचे मोठे नुकसान
- हॉटेल गोकुळ येथे घडली घटना

पाय घसरला अन् सर्व काही संपले
दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली. कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा मुले आणि दोन मुलींपैकी एक मुलगा आणि एक मुलगी पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुले ही पर्यटनासाठी या भागात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून या दोन तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ते वाहून गेल्याची घटना प्रत्यक्षदर्शनींनी पोलिसांना दिली. घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि या दोघांना शोधण्याचे काम तेव्हा सुरु होते. या घटनेमुळे सोबत आलेले मित्र-मैत्रिणी पूर्णतः घाबरलेल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या अगोदर देखील कुंडमळा धबधब्यामध्ये अनेक जण वाहून गेले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात शोधकार्य झपाट्याने सुरू असून पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.