मुंबई-पुण्यात पाऊस, मराठवाडा-विदर्भातही जोरदार बरसणार, पुढील चार दिवस कसे असेल हवामान?

Mumbai weather forecast today: राज्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. पुढील चार दिवस राज्यात सर्वदूर जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
पावसाचे ताजे अपडेट्स
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रभरात गेले दोन आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र दोन दिवसांपासून नाशिक, मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भातही पूरसदृश पाऊस झाला आहे. तिथे अतिवृष्टीमुळे अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. गणेश चतुर्थीला गणरायाच्या आगमनालाही पावसाचे हजेरी लावली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला होता, तसेच गणपतीबाप्पाच्या आगमनापासून पुढील चार दिवस पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कसे असेल पुढील चार दिवसाचे हवामान?

वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. मात्र दोन दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावसाने उघडीप घेतली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारपासून पुढे चार दिवस महाराष्ट्रभरातील जवळपास सर्वच भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढेल, तसेच घाटावरही येत्या चार दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

मराठवाडा, विदर्भात धो धो पाऊस बरसणार, बीड-हिंगोलीतही मुसळधार पाऊस

मराठवाडा, विदर्भात पावसाची स्थिती कायम राहणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय परभणी, धाराशिव जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोली, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे, मुंबई-नाशकात जोरदार सरी, पुण्याला ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भातही धो-धो

मुंबई-पुण्यातही पावसाची शक्यता, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातही पावसाच्या सरी

मुंबई, पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पुण्याला शनिवारी ऑरेंज लर्ट देण्यात आला होता. शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यासह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

maharashtra monsoon newsmaharashtra rain newsmaharashtra rain news todayMaharashtra Rain UpdatesMumbai rain newsrain alert mumbaiपावसाच्या बातम्यामान्सून अपडेट
Comments (0)
Add Comment