Pune Accident: प्रतीक तुकाराम गारे (वय २१, रा. हिवरे ता. जुन्नर), तेजस मारुती घोडे (वय २१, रा. बोरघर ता. आंबेगाव) आणि करण ज्ञानेश्वर ढेंगले (वय १८, रा. ढेंगळेवाडी ता. जुन्नर) अशी मृत्युमूखी पडलेल्यांची नावे आहेत.
हायलाइट्स:
- खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक
- भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
- बसच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील तिघेजण पहाटे दीडच्या सुमारास नाशिकच्या बाजूने पुण्याकडे जात असताना एका खासगी ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिली. या घटनेनंतर ट्रॅव्हल्सचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि चोप दिला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम जानकु गारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करत आहेत.
या घटनेमुळे या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, यामुळे तिघांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.