बुधवार ११ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २० भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल अष्टमी रात्री ११-४५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा रात्री ९-२० पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक रात्री ९-२० पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
ज्येष्ठा नक्षत्र रात्री ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यांनतर मूल नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपर्यत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२७
- सूर्यास्त: सायं. ६-४३
- चंद्रोदय: दुपारी १-१२
- चंद्रास्त: रात्री १२-१०
- पूर्ण भरती: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ३.३४ मीटर, दुपारी ३-५७ पाण्याची उंची ३.०५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१९ पाण्याची उंची २.५१ मीटर, रात्री १०-३६ पाण्याची उंची १.५३ मीटर
- सण आणि व्रत : दुर्गाष्टमी, ज्येष्ठा गौरी पूजन, श्री राधाष्टमी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून १८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटांपासून ते ३ वाजून १२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
ज्येष्ठा गौरीची पूजा करून नैवेद्य अर्पण करा तसेच राधा राणीला श्रृंगाराचे साहित्य अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)