आजचे पंचांग 17 सप्टेंबर 2024: अनंत चतुर्दशी, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मंगळवार १७ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २६ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ११-४४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका दुपारी १-५३ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ उत्तररात्री ५-४३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद २६, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, मंगळवार, विक्रम संवत २०८१ रब्बी उल्लावल १३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १७ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, चतुर्दशी तिथी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ

शतभिषा नक्षत्र दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यांनतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, धृतीमान योग सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२८
  • सूर्यास्त: सायं. ६-३८
  • चंद्रोदय : सायं. ६-१६
  • चंद्रास्त: पहाटे ५-२३

  • पूर्ण भरती: सकाळी ११-१४ पाण्याची उंची ४.५४ मीटर, रात्री ११-३४ पाण्याची उंची ४.३९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४३ पाण्याची उंची ०.६० मीटर, सायं. ५-२२ पाण्याची उंची ०.८६ मीटर
  • सण आणि व्रत : अनंत चतुर्दशी, प्रौष्ठपदी पौर्णिमा, विश्वकर्मा दिन

अनंत चर्तुदशी गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त

  • दुपारी ३ वाजून २० मिनिटांपासून ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत
  • यंदा १ तास ३० मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे.
  • विसर्जन करण्यापूर्वी पूजेची वेळ – सकाळी ६ ते ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून २० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून ते ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांपासून ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांपासून ते ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.

आजचा उपाय
विष्णु चालीसाचे पठण करा आणि तुळशीचे पूजन करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

17 september daily panchang17 सप्टेंबर दिनविशेष17 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiअनंत चतुर्दशीआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांग
Comments (0)
Add Comment