बुधवार २५ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ३ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण अष्टमी दुपारी १२-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा रात्री १०-२२ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
आद्रा नक्षत्र रात्री १० वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, वरियान योग मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२९
- सूर्यास्त: सायं. ६-३१
- चंद्रोदय: रात्री १२-४७
- चंद्रास्त: दुपारी १-४५
- पूर्ण भरती: पहाटे ५-२८ पाण्याची उंची ३.५३ मीटर, सायं. ५-०३ पाण्याची उंची २.९१ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१२ पाण्याची उंची २.३८ मीटर, रात्री ११-५६ पाण्याची उंची १.६९ मीटर
- सण आणि व्रत: सौभाग्यवतींची श्राद्ध तिथी, मातृ नवमी, जीवित्पुत्रिका व्रत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपासून १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
गणपती स्तोत्राचे पठण करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)