Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2024: सौभाग्यवती श्राद्ध तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

16

बुधवार २५ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ३ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण अष्टमी दुपारी १२-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा रात्री १०-२२ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल २१, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २५ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. अष्टमी तिथी दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ

आद्रा नक्षत्र रात्री १० वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, वरियान योग मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२९
  • सूर्यास्त: सायं. ६-३१
  • चंद्रोदय: रात्री १२-४७
  • चंद्रास्त: दुपारी १-४५

  • पूर्ण भरती: पहाटे ५-२८ पाण्याची उंची ३.५३ मीटर, सायं. ५-०३ पाण्याची उंची २.९१ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१२ पाण्याची उंची २.३८ मीटर, रात्री ११-५६ पाण्याची उंची १.६९ मीटर
  • सण आणि व्रत: सौभाग्यवतींची श्राद्ध तिथी, मातृ नवमी, जीवित्पुत्रिका व्रत

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपासून १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
गणपती स्तोत्राचे पठण करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.