Vastushastra Rules For Kalash Pooja : नवरात्रीच्या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते ते कलश पूजन. कलशाची स्थापना ही नवरात्रीमधील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली विधी मानली जाते. हा विधी देवीच्या ऊर्जेचा आणि आवाहानाचा प्रतीक मानला जातो. परंतु, तुम्ही घरात कलशाची स्थापना करणार असाल तर वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कलाशाची स्थापना कोणत्या दिशेला करायला हवी. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया नियम
३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हा काळ देशभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक धर्मानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
नवरात्रीच्या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते ते कलश पूजन. कलशाची स्थापना ही नवरात्रीमधील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली विधी मानली जाते. हा विधी देवीच्या ऊर्जेचा आणि आवाहानाचा प्रतीक मानला जातो. परंतु, तुम्ही घरात कलशाची स्थापना करणार असाल तर वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कलाशाची स्थापना कोणत्या दिशेला करायला हवी. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया नियम
कलश स्थापनेची दिशा
वास्तुनुसार नवरात्रीमध्ये कलश स्थापना अधिक महत्त्वाचे आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवायला हवा. ही दिशा भगवान शंकराची मानली गेली आहे. यामुळे घरात समृद्धी टिकून राहाते. जर तुम्हाला ईशान्य दिशेला कलश ठेवता येत नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला कलश स्थापना करु शकता. दक्षिण दिशेला कलश ठेवणे टाळावे.
कलश स्थापना शुभ मुहूर्त
वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करताना त्याचा शुभ मुहूर्त पाहा. ज्यामुळे तुम्हाला लाभ होतील. कलश स्थापना ही सकाळी केली जाते. कलश स्थापना करण्यापूर्वी ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा. नवरात्रीच्या पहिल्या माळेला अर्थात प्रतिपदा तिथीला कलश स्थापना करणे अंत्यत शुभ मानले जाते.
कलश कोणत्या धातुचा असावा?
नवरात्रीच्या विधीसाठी कलश हा नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा असावा. या धातूंना हिंदू धर्मात पवित्र मानले गेले आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहाते. कलश स्थापित करण्यासाठी प्लास्टिक, लोखंड किंवा कृत्रिम साहित्याचा वापर करु नका. तसेच कलशावर आंब्याची डहाळे, सुपारी, देठाची पाने, नारळ, लाल कापड आणि नाडाबंडल बांधून कलश स्थापना करा.
कलशावर स्वस्तिक बनवा
वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करण्यापूर्वी त्यावर स्वस्तिक चिन्ह असायला हवे. स्वस्तिक हे पवित्र प्रतीक मानले जाते. तसेच समृद्धी, कल्याण आणि जीवनाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.