आजचे अंकभविष्य, 12 ऑक्टोबर 2024: दसऱ्यानिमित्त सुखसमृद्धीचा योग ! प्रत्येक कामात तुमचा विजय ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 12 October 2024 : शनिवार, 12 ऑक्टोबर, विजयादशमी अर्थात दसरा आहे. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणतात. सीमोल्लंघन, शमी पूजन, अपरिजीता देवीची पूजा आणि शस्त्रपूजन या दिवशी करतात. सर्व मूलांकावर दुर्गामातेची कृपा राहील. हा एक शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्ही नवीन गोष्टींची सुरूवात करू शकता. मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही मेहनतीवर भर द्या, सफलता नक्की मिळेल. मूलांक 2 च्या लोकांनी कामात घाईगडबड टाळावी. मूलांक 4 असणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. मूलांक 5 साठी कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. मूलांक 7 चे जातक जास्त खर्च करणार आहेत. तर मूलांक 9 असणारे स्वतःसाठी खर्च करणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 12 ऑक्टोबर 2024: दसऱ्यानिमित्त सुखसमृद्धीचा योग ! प्रत्येक कामात तुमचा विजय ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ank bhavishya, 12 October 2024: शनिवार, 12 ऑक्टोबर विजयादशमी अर्थात दसरा आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून शुभकार्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. दसऱ्या निमित्त सर्व मूलांकांची कामे पूर्ण होतील तसेच नवीन कार्याची तुम्ही सुरूवात करु शकता. मूलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस उत्तम असून तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कुटुंबात वातावरण अनुकूल असून तुम्ही स्वतःवर खर्च करणार आहात. ताणतणाव कमी होईल. मूलांक ६ सह हे जातक कामात व्यस्त राहणार आहेत. कामाचे योग्य नियोजन करा म्हणजे धावपळ होणार नाही. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 12 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – मेहनत करावी लागेल

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही मेहनतीवर भर द्या, कारण आज कठोर मेहनत केली तर त्याचे उत्तम फळ मिळेल. फक्त नशिबावर विसंबून राहून चालत नाही. सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक सन्मान तुम्हाला मिळणार आहे. प्रवासाचा योग आहे आणि त्याचा लाभ घ्या. तुमच्या हस्ते एखादे धार्मिक कार्य पूर्ण होणार आहे

मूलांक 2 – कामात घाईगडबड टाळा

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. कामात घाईगडबड टाळावी. कारण अती घाई संकटात नेई असे म्हणतात. वडिलांची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. कुटुंबासोबत संध्याकाळचा वेळ उत्तम जाणार आहे. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या एखाद्या कार्यक्रमाला जाणार आहात.

मूलांक 3 – अपत्य सुख मिळणार

मूलांक 3 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती ठिक असेल. एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळेल. घरात वातावरण आनंदी असेल. प्रत्येकजण तुमचा मानसन्मान करेल. अपत्य सुख तुम्हाला नक्की मिळणार आहे.

मूलांक 4 – विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे, खास करून विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळले. मित्रासोबत शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत असाल तर वेळ उत्तम आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळणार आहे. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात खूप सक्रिय राहणार आहात.

मूलांक 5 – कुटुंबात अनुकूल वातावरण

मूलांक 5 साठी आजचा दिवस उत्तम असून कुटुंबातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होवून दानधर्म करणार आहात. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन करणार आहात.

मूलांक 6 – कामात व्यस्त राहणार, धावपळीचा दिवस

मूलांक 6 साठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप धावपळीचा असेल, कामात जास्त व्यस्त राहणार आहात. तुमचा बराच वेळ मिटिंगमध्ये जाईल तसेच बॉसकडून नवीन प्रोजेक्टवर चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठोर मेहनतीचा आहे. घरातील मोठ्यांकडून सहकार्य आणि आशीर्वाद मिळणार आहे.

मूलांक 7 – खर्च करणार आहात

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही खूप खर्च करणार आहात. तुम्ही ज्या लोकांसोबत असणार आहात त्यांच्यामुळे खर्च जास्त होणार आहे. त्यामुळे यावर खास विचार करावा. कुटुंबात वातावरण हसते खेळते असेल.

मूलांक 8 – वादविवादापासून दूर राहा

मूलांक 8 साठी दिवस आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहणेच योग्य आहे. वडिलोपार्जीत संपत्तीवरून वाद होवू शकतो. धनलाभाचे योग आहेत पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाल फायदा मिळणार नाही.

मूलांक 9 – स्वतःसाठी खर्च करणार

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणार आहात. मौजमजा आणि तुमची आवड यावर तुम्ही खर्च करणार आहात. आज प्रत्येक कामात उत्साह जाणवेल. जे काम कराल त्यात यश मिळेल.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

12 ऑक्टोबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 12 October 2024Numerology 12 October 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 12 OctoberToday's Numerology 12 October prediction October in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्यानोकरी मिळणार का?राशी भविष्य
Comments (0)
Add Comment