Mahim Vidhan Sabha : शिंदेंच्या सेनेच्या यादीत माहीम मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनाच उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र ठाकरे गटाबाबत अद्याप सस्पेन्स बाकी आहे.
हायलाइट्स:
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
- मनसेने दादर-माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माहीम मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
‘मातोश्री’ विचारात
शिवसेना भवन असलेल्या दादर माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. उमेदवारी जाहीर करायची की नाही? या पेचप्रसंगात सध्या मातोश्रीचे थिंक टॅंक आहे.
कोणाची नावं चर्चेत?
उद्धव ठाकरेंकडून या मतदारसंघात सध्या दादरचे विभाग प्रमुख महेश सावंत तसेच उपनेते विशाखा राऊत हे इच्छुक उमेदवार आहेत. जर-तरची शक्यता फेटाळली तर महेश सावंत हेच नाव सध्या उद्धव ठाकरेंच्या सेनेमार्फत आघाडीवर आहे. या संदर्भातली घोषणा आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे.
Amit Thackeray : शिवसेना भवनाच्या अंगणातून अमित ठाकरे मैदानात, शिंदेंनी एक्का टाकला, पण ‘मातोश्री’ बुचकळ्यात
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून काल उशिरा ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुती मनसेच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार उभे करणार नाही असं म्हटलं जात होतं. मात्र या गोष्टीला तिलांजली देत शिंदेंच्या सेनेमार्फत विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.
ठाकरेंच्या सेनेमार्फत जर उमेदवार दिला गेला तर या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळेल. सध्या तरी दादर माहीम मतदारसंघात तुल्यबळ लढती पाहायला मिळतील असं चित्र अपेक्षित आहे.