अमित ठाकरेंना ‘बाय’ नाही; जागावाटपाआधीच मातोश्रीकडून उमेदवार ठरला; माहीममध्ये तिरंगी सामना

Amit Thackeray: मनसेनं अमित ठाकरेंना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे माहीममध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा होती. पण तसं घडलेलं नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अमित ठाकरेंना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर आता ठाकरेसेनेनंदेखील माहीम मतदारसंघातून उमेदवार दिला आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ठाकरेंकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ठाकरेंनी महेश सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिंदेसेना विरुद्ध मनसे विरुद्ध ठाकरेसेना असा सामना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीममध्ये रंगणार आहे.

माहीममधून अमित ठाकरेंना उमेदवारी मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. काल मनसेनं रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अमित ठाकरेंच्या नावाचा समावेश आहे. अमित ठाकरे रिंगणात असल्यास ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढले. त्यावेळी मनसेनं तिथे उमेदवार दिला नव्हता. त्याची परतफेड उद्धव ठाकरे अमित यांच्याविरोधात उमेदवार न देता करतील, असं बोललं जात होतं. पण तसं काही घडलेलं नाही.
NCP Candidate List: ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव
उद्धव ठाकरेंनी माहीममधून महेश सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. ठाकरेसेनेचे महेश सावंत विरुद्ध मनसेचे अमित ठाकरे विरुद्ध शिंदेसेनेचे सदा सरवणकर अशी तिरंगी लढत माहीममध्ये होणार आहे. माहीममधून महेश सावंत विधानसभा निवडणूक लढतील, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसमोर केली. एकदिलानं काम करा आणि दादरमध्ये भगवा फडकवा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Amit Thackeray: अमित ठाकरेंना ‘बाय’ नाही; जागावाटपाआधीच मातोश्रीकडून उमेदवार ठरला; माहीममध्ये तिरंगी सामना

राज ठाकरेंच्या मनसेनं लोकसभा निवडणुकीत मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. त्यातील एक प्रचारसभा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी घेतली. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदेंचा प्रचार केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून माहीममध्ये उमेदवार दिला जाणार नाही. त्यांच्याकडून अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जाईल, अशीही चर्चा होती. पण शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलेली आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionsmaharashtra electionsmns vs shiv senaअमित ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र राजकीय बातम्याराज ठाकरेशिवसेनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसदा सरवणकर
Comments (0)
Add Comment