Dhule Crime News: गेल्या तीन महिन्यांपूर्वीच वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे तत्कालीन अधीक्षिका मनीषा गिरी यांना देखील लाचखोरी प्रकरणी ‘एसीबी’ने पकडले होते. यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले होते.
हायलाइट्स:
- धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
- दोन लाखांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- एसीबीच्या कारवाईमुळे धुळ्यातील शिक्षण विभागात खळबळ
बूट व पायमोजे पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे मागितली लाज
तक्रारदार यांचे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे दुकान आहे. तर फर्ममार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बूट व पायमोजे पुरवठा करण्याबाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकूण ४० लाख रुपयांच्या बूट आणि पायमोजे या साहित्यांचा पुरवठा केला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचखोरी वाढली आहे. वर्षभरात शिक्षण विभागात एसीबीची ही तिसरी कारवाई आहे.
जळगावात दीड कोटींची रक्कम जप्त
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.