Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dhule Crime: सेवानिवृत्तीला ७ दिवस शिल्लक, गटशिक्षणाधिकाऱ्याचा अजब कारनामा, शिक्षण विभागात खळबळ

14

Dhule Crime News: गेल्या तीन महिन्यांपूर्वीच वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे तत्कालीन अधीक्षिका मनीषा गिरी यांना देखील लाचखोरी प्रकरणी ‘एसीबी’ने पकडले होते. यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले होते.

हायलाइट्स:

  • धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
  • दोन लाखांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
  • एसीबीच्या कारवाईमुळे धुळ्यातील शिक्षण विभागात खळबळ
Lipi
धुळे गटशिक्षणाधिकारी अटक

अजय गर्दे, धुळे : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट आणि पायमोजे या वस्तुंचे वाटप केल्यानंतर तक्रारदार ठेकेदाराकडून ४० लाख रुपयांच्या बिलापोटी ५ टक्क्याप्रमाणे २ लाख रुपयांची मागणी केली. लाच मागितल्याप्रकरणी साक्री येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे (प्राथमिक व माध्यमिक) अधीक्षक महेंद्र गोपाळराव सोनवणे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. सेवानिवृत्तीला ७ दिवस शिल्लक असतानाच सोनवणे यांच्यावर ही कारवाई झाली. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.गेल्या तीन महिन्यांपूर्वीच वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे तत्कालीन अधीक्षिका मनीषा गिरी यांना देखील लाचखोरी प्रकरणी ‘एसीबी’ने पकडले होते. यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले होते. तर या कारवाईमुळे पुन्हा ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन पुन्हा रखडले जाण्याचे चित्र आहे. ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एसीबीच्या पथकाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
Rohit Pawar: जळगावात दीड कोटींची रोकड, रोहित पवार भडकले, दलालांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही

बूट व पायमोजे पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे मागितली लाज

तक्रारदार यांचे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे दुकान आहे. तर फर्ममार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बूट व पायमोजे पुरवठा करण्याबाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकूण ४० लाख रुपयांच्या बूट आणि पायमोजे या साहित्यांचा पुरवठा केला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचखोरी वाढली आहे. वर्षभरात शिक्षण विभागात एसीबीची ही तिसरी कारवाई आहे.

जळगावात दीड कोटींची रक्कम जप्त

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.