Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवी मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या; भावाच्या बायकोसोबतच संबंध, घटनेने परिसरात खळबळ

10

Navi Mumbai Boyfriend Killed Live In Partner: नवी मुपंबईत एका व्यक्तीने आपल्याच लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला त्याच्या बायकोच्या हत्येप्रकरणात आधीच शिक्षा झालेली होती.

हायलाइट्स:

  • नवी मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या
  • दारुच्या नशेत महिलेवर जोरदार हल्ला
  • आरोपीला पोलिसांकडून तात्काळ अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: दारुच्या नशेत एका व्यक्तीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला पनवेल येथून अटक केली आहे. या व्यक्तीची लिव्ह इन पार्टनर ही त्याच्याच मोठ्या भावाची बायको असल्याची माहिती आहे, जो आता या जगात नाही. २००८ मध्ये हा आरोपी आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणात तुरुंगात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो त्याच्या विधवा वहिनीसोबत राहू लागला, अशी माहिती आहे. कमल्या रागो निरगुडा असे आरोपीचे नाव असून त्याला पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येनंतर अटक केली आहे.पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या टॉवर वाडीतील पोलिस पाटील यांनी आम्हाला सांगितले की एका महिलेवर तिच्या लिव्ह इन पार्टनरने हल्ला केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे.
Bihar News: बॉयफ्रेण्डचं लग्न ठरलं, संतापून हत्या, बॉडीचे बारीक बारीक तुकडे; समलिंगी प्रेमाचा थरारक अंत
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी निरगुडा हा तिथेच होता. तर, ज्यांच्यावर हल्ला झाला त्या शनिवारी गोमा निरगुडा (वय वर्ष ४५) या जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं. रुग्णलयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. आरोपी जिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, ती त्याच्या दिवंगत मोठ्या भावाची पत्नी होती, असंही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपी अटक केली असून त्याच्यावर कलम भारतीय न्याय संहितेच्या १०३-(हत्या) आणि भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२-(हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर धारदार वस्तूने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या; भावाच्या बायकोसोबतच संबंध, घटनेने परिसरात खळबळ

गुन्ह्याच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. आरोपीने महिलेची हत्या केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता. आरोपी जामिनावर सुटला आहे की त्याची शिक्षा पूर्ण झाली आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.