माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढताय, रोहित पाटलांचा संजय काकांना टोला

Sangli News: ”सत्तेचा माज आलेला नेता आता विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढेल. जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार”‘.

हायलाइट्स:

  • केवळ स्वार्थासाठी संजय काका पाटलांनी पक्ष आणि गट बदलले
  • माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढत आहेत
  • माझ्या विरोधात सर्वजण एकत्र झाले असले तरी मतदार मला तारतील
Lipi
रोहित पाटील उमेदवारी अर्ज

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : ”केवळ स्वार्थासाठी संजय काका पाटलांनी पक्ष आणि गट बदलले. माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढत आहेत. माझ्या विरोधात सर्वजण एकत्र झाले असले तरी मतदार मला तारतील याचा विश्वास मला आहे”. रोहित पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी ते जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. तासगाव मार्केट कमिटी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय काका पाटील यांना टोला लगावला.”लोकहित बाजूला ठेवून संजय काका पाटील यांनी राजकीय भूमिका बजावलेली आहे. लोक हे सर्व जाणून आहेत. संजय काका पाटील हे माझ्या वडिलांविरुद्ध लढत होते. त्यामुळे लोक त्या पद्धतीने निर्णय घेत होते. आता पुन्हा लोक हे जाणून आहेत. त्यामुळे लोकच निर्णय घेतील. अजितराव घोरपडे यांच्यासह सगळ्यांना का एकत्र यावं वाटलं असेल याची कल्पना नाही. सर्वजण जरी एकत्र आले असतील तरी माझ्या मतदारसंघातील लोक मला तारतील याचा मला विश्वास आहे”.
Amit Thackeray : कर्करोगाच्या चर्चा, राखेतून भरारी; अमित राज ठाकरे मनसेसाठी कसे ठरणार तारणहार?

खासदार विशाल पाटील काय म्हणाले

खासदार विशाल पाटील यांनी देखील संजय काका पाटलांना चांगलंच फटकारलं आहे. ”सत्तेचा माज आलेला नेता आता विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढेल. जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार. भुताला काढण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत, त्याला पुन्हा डोके वर काढू देणार नाही. सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील. सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत”

”संजय काका पाटील यांचा रोहित पाटील यांच्या विरोधात खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी जनतेने उतरवलं आहे तरी देखील त्यांना अजून हवा आहे. इतके दिवस सांगत होते की प्रभाकर पाटील आमदार होणार. जो सत्तेसाठी पोराला बाजूला करून स्वतः नेऊन लढतो तो जनतेसाठी काय करणार? स्वतःच्या पोरासाठी जो थांबू शकत नाही. हे जनता आता जाणून आहे. रोहित पाटील हे आमच्यासाठी राबले आहेत. आता आमच्यावर पैरा फेडण्याची वेळ आलीये. आमचं दादा गाणं रोहित पाटलांसाठी राबणार”.
‘भाजप आणि अजित दादांच्या पक्षाकडून मतदारसंघात ३०-४० कोटी वाटले जाणार’, पवार गटाच्या बड्या नेत्याचा आरोप

”कोणत्या अडचणीमुळे अजितराव घोरपडे यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दिला हे माहीत नाही. पण मी अजितराव घोरपडे यांना विनंती करणार आहे की ज्या भुताला काढण्यासाठी आपण एकत्र आलो. त्या भुताला पुन्हा वर डोकं वर आणू देऊ नका असं मी त्यांना सांगितलं आहे. पण अजितराव घोरपडे यांनी कोणत्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला हे माहीत नाही. पण अजितराव घोरपडे यांचे कार्यकर्ते तरुण उमेदवाराच्या पाठीशी आहेत”, असं म्हणत विशाल पाटील यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत संजय काका पाटलांवर टीकेच्या फैरी झाडल्या आहेत.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

maharashtra vidhan sabha election application dayrohit patil nomination formrohit patil sanjay kaka patil commentsangli marathi newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकरोहित पाटील उमेदवारी अर्जरोहित पाटील संजय काका पाटील टीकासांगली मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment