संजय राऊतांना जास्त मनावर घेऊ नका, नाना पटोलेंनी पुन्हा डिवचलं; शीतयुद्ध पुन्हा पेटणार?

Nana Patole on Sanjay Raut: ”संजय राऊत यांना जास्त मनावर घेण्याची गरज नसल्याचं” म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं आहे. त्यामुळे राऊत आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा नव्याने पेटण्याचे चिन्ह आहेत.

हायलाइट्स:

  • संजय राऊतांना जास्त मनावर घेऊ नका
  • नाना पटोलेंनी राऊतांना पुन्हा डिवचलं
  • नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
Lipi
नाना पटोले बातम्या

अभिजित दराडे, पुणे : महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोंगडे अजून भिजतच आहे. काल संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगत २५५ जागांचा तिढा सुटल्याचा दावा केला आहे. मात्र अजूनही पूर्ण जागा वाटप झालं नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यात खटके उडायचे काही कमी होत नाहीत. शिवसेना ठाकरे गटाकडून १०० हून अधिक जागा लढणार असल्याचा दावा केला जात होता. पण, आता ठाकरे गट ८५ जागा लढणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, ”अजून काही ओव्हर शिल्लक आहेत, ८५ पर्यंत आलो आहे १५ हवे आहेत. अजून २५ ओव्हर खेळायचे बाकी आहेत. कोण कधी सेंच्युरी मारेल” सांगता येत नाही. यासोबत राऊतांनी ठाकरे गट १०० पेक्षा अधिक जागा लढणार असल्याचे संकेत दिले. संजय राऊत यांनी १०० पेक्षा अधिक जागा लढणार असल्याचे संकेत दिल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये एका वाक्यात संजय राऊतांच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे.
MNS Candidate List: मनसेकडून उमेदवार जाहीर, यादी पाहून निष्ठावंताला धक्का; थेट राज ठाकरेंच्या भेटीला गेला अन्…

”संजय राऊत यांना जास्त मनावर घेण्याची गरज नसल्याचं” म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं आहे. त्यामुळे राऊत आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा नव्याने पेटण्याचे चिन्ह आहेत. नुकतेच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडला लक्ष घालावे लागले होते. त्यानंतर हा वाद मिटल्याचे दोन्ही बाजूकडून सांगण्यात आले होते. मात्र आज सकाळपासूनच महाविकास आघाडीतील या दोनही बड्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा खटके उडायला सुरुवात झाल्याने मविआची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाना पटोले हे मार्गदर्शन करण्यास आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आणि काँग्रेसच्या पहिल्या यादीबाबत देखील स्पष्टता दिली आहे. ”आज काँग्रेसच्या उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवणार असून उद्या सायंकाळपर्यंत काँग्रेसची उमेदवार यादी फायनल होऊन जाहीर करण्यात येईल”, असं पटोले यांनी सांगितले.

”महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. आमच्या जागा वाटपाबाबत महायुतीतील नेते टीका करत असले तरी त्यांच्या तिथे सारं काही आलबेल नाही. त्यांच्या सगळ्या गोष्टी तिकडे दिल्लीमध्ये ठरत आहेत. आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत एकेक जागेवर चर्चा होत असते. त्यामुळे वाटाघाटीमध्ये सर्व जागांचा प्रश्न निकाली”, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
Rohit Patil: माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढताय, रोहित पाटलांचा संजय काकांना टोला

”निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाची चर्चा करणे योग्य नाही. आत्ता महाराष्ट्र वाचवणे हे आमचं प्रथम दायित्व आहे. यासाठी सर्व आघाडीचे नेते काम करत असून मुख्यमंत्री पदाची निवड ही लोकांतून निवडून आल्यानंतर करण्यात येईल. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरती पूर्णविराम देणे आवश्यक” असल्याचं पटोले यांनी सांगितलं. ”सध्या सत्तेमध्ये बसलेली लोकं ही डाकू आहेत. निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झाली असताना मतदानही झालं नसताना यांनी सत्तेत कोण येणार आहे हे जाहीर करून टाकलं आहे. यातून यांची डाकू प्रवृत्ती” समोर येत असल्याची टीका पटोले यांनी केली.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

nana patole newsnana patole sanjay raut commentarypune latest marathi newsSanjay Raut Newsनाना पटोले बातम्यानाना पटोले संजय राऊत टीकापुणे लेटेस्ट मराठी बातम्यासंजय राऊत बातम्या
Comments (0)
Add Comment