Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nana Patole on Sanjay Raut: ”संजय राऊत यांना जास्त मनावर घेण्याची गरज नसल्याचं” म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं आहे. त्यामुळे राऊत आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा नव्याने पेटण्याचे चिन्ह आहेत.
हायलाइट्स:
- संजय राऊतांना जास्त मनावर घेऊ नका
- नाना पटोलेंनी राऊतांना पुन्हा डिवचलं
- नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
MNS Candidate List: मनसेकडून उमेदवार जाहीर, यादी पाहून निष्ठावंताला धक्का; थेट राज ठाकरेंच्या भेटीला गेला अन्…
”संजय राऊत यांना जास्त मनावर घेण्याची गरज नसल्याचं” म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं आहे. त्यामुळे राऊत आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा नव्याने पेटण्याचे चिन्ह आहेत. नुकतेच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडला लक्ष घालावे लागले होते. त्यानंतर हा वाद मिटल्याचे दोन्ही बाजूकडून सांगण्यात आले होते. मात्र आज सकाळपासूनच महाविकास आघाडीतील या दोनही बड्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा खटके उडायला सुरुवात झाल्याने मविआची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाना पटोले हे मार्गदर्शन करण्यास आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आणि काँग्रेसच्या पहिल्या यादीबाबत देखील स्पष्टता दिली आहे. ”आज काँग्रेसच्या उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवणार असून उद्या सायंकाळपर्यंत काँग्रेसची उमेदवार यादी फायनल होऊन जाहीर करण्यात येईल”, असं पटोले यांनी सांगितले.
”महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. आमच्या जागा वाटपाबाबत महायुतीतील नेते टीका करत असले तरी त्यांच्या तिथे सारं काही आलबेल नाही. त्यांच्या सगळ्या गोष्टी तिकडे दिल्लीमध्ये ठरत आहेत. आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत एकेक जागेवर चर्चा होत असते. त्यामुळे वाटाघाटीमध्ये सर्व जागांचा प्रश्न निकाली”, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
Rohit Patil: माझ्या वडिलांविरुद्ध लढणारे आता माझ्याविरुद्ध लढताय, रोहित पाटलांचा संजय काकांना टोला
”निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाची चर्चा करणे योग्य नाही. आत्ता महाराष्ट्र वाचवणे हे आमचं प्रथम दायित्व आहे. यासाठी सर्व आघाडीचे नेते काम करत असून मुख्यमंत्री पदाची निवड ही लोकांतून निवडून आल्यानंतर करण्यात येईल. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरती पूर्णविराम देणे आवश्यक” असल्याचं पटोले यांनी सांगितलं. ”सध्या सत्तेमध्ये बसलेली लोकं ही डाकू आहेत. निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झाली असताना मतदानही झालं नसताना यांनी सत्तेत कोण येणार आहे हे जाहीर करून टाकलं आहे. यातून यांची डाकू प्रवृत्ती” समोर येत असल्याची टीका पटोले यांनी केली.