पुण्यातील मोठी बातमी, प्रसिद्ध चितळे बंधूंच्या दुकानात दरोडा, CCTV फुटेज व्हायरल

Pune Chitale Shop Theft CCTV Footage : पुण्यामध्ये दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध चितळे बंधूंच्या दुकानात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या सणाच्या तोंडावर पुण्यातील आणि देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू मिठाईच्या दुकानात चोरी झाली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून १ लाख ४१ हजारांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली. त्यासोबतच चितळेंची प्रसिद्ध असलेली बाकरवडीही त्यांंनी चोरांनी नेली. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोरल आले आहे. बाणेर पोलिसांना चोरी झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या बाणेर शाखेत आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम १ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे. लॉकरमधील मध्यभागी असलेला शटर लॉक केलेला नसल्यामुळे चोरट्यांना तो उघडणे सोपे गेले. मात्र, एवढी आतली माहिती चोरट्यांना कशी मिळाली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या कटात कोणता कामगार किंवा आतला माणूस सहभागी आहे का, याची शंका वर्तवली जात आहे. बाणेर पोलीस स्टेशनमध्ये या चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि चोरी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहत तपासाला सुरूवात केली आहे. चोरी करून झाल्यावर कोणत्या मार्गाने फरार झाले हे पाहून त्यांची माहिती घेत आहेत.

पैसे आणि दाग-दागिन्यांची घ्या काळजी

दरम्यान, दिवाळीचा सण असल्याने आता प्रत्येकजण आपले दाग-दागिने आणि पैसे घरी आणतात. लक्ष्मीपूजनाला या गोष्टी पूजल्या जातात. त्यानंतर सुट्टीत बरेचजण दिवाळीच्या सणाला गावी जातात. मात्र याच गोष्टीचा चोर फायदा घेतात, त्यामुळे घरी चोरी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. घरात आणलेले दागदागिने आणि कॅश रक्कम सोबत घेऊन जा किंवा बँकमध्ये ठेवा जेणकरून चोरांच्या हाती लागणार नाही.

Source link

chitale bandhuPune Chitale NewsPune newsचितळे बंधूपुणे चितळे बंधू मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment