Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Chitale Shop Theft CCTV Footage : पुण्यामध्ये दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध चितळे बंधूंच्या दुकानात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या बाणेर शाखेत आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम १ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे. लॉकरमधील मध्यभागी असलेला शटर लॉक केलेला नसल्यामुळे चोरट्यांना तो उघडणे सोपे गेले. मात्र, एवढी आतली माहिती चोरट्यांना कशी मिळाली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या कटात कोणता कामगार किंवा आतला माणूस सहभागी आहे का, याची शंका वर्तवली जात आहे. बाणेर पोलीस स्टेशनमध्ये या चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि चोरी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहत तपासाला सुरूवात केली आहे. चोरी करून झाल्यावर कोणत्या मार्गाने फरार झाले हे पाहून त्यांची माहिती घेत आहेत.
पैसे आणि दाग-दागिन्यांची घ्या काळजी
दरम्यान, दिवाळीचा सण असल्याने आता प्रत्येकजण आपले दाग-दागिने आणि पैसे घरी आणतात. लक्ष्मीपूजनाला या गोष्टी पूजल्या जातात. त्यानंतर सुट्टीत बरेचजण दिवाळीच्या सणाला गावी जातात. मात्र याच गोष्टीचा चोर फायदा घेतात, त्यामुळे घरी चोरी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. घरात आणलेले दागदागिने आणि कॅश रक्कम सोबत घेऊन जा किंवा बँकमध्ये ठेवा जेणकरून चोरांच्या हाती लागणार नाही.