Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Muslim Candidate against Nitesh Rane: कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणेंना लढत देण्यासाठी मुस्लिम समाजाचा उमेदवार राजकीय आखाड्यात उतरणार आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येणार आहे.
अपक्ष उमेदवार नवाज खाणी म्हणाले, नितेश राणे हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत असतात. २०१९च्या निवडणुकीमध्ये देवगड तालुक्यातील मुस्लिम समाजाने त्यांना भरभरून मतदान केले होते. या मतदानावरच नितेश राणे हे निवडून आले होते. नितेश राणे हे वारंवार मुस्लिम समाजावर टीका करत असतात त्यामुळे मला समाजाच्या वतीने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
मुस्लिम समाजावार टीका केल्यामुळे आता महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर मतदारसंघातूनच मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने कणकवली आणि देवगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. मुस्लीम समाज आपल्या पाठीशी आहे त्यामुळे या निवडणुकीत नितेश राणेंना समाजाची ताकद दाखवणार, असे म्हणत नवाज खाणी यांनी नितेश राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहे. मात्र ही निवडणूक आपण सर्वधर्म समभाव या मुल्याला धरुनच लढविणार आहोत, असे खानी यांनी सांगितले.
यासोबतच खाणींनी ‘आपण निवडणूक रिंगणार उभे राहणार हे समजताच आपल्यावर दबाव तंत्र वापरले जात आहे व धमकीचे फोन सुरु झाले आहेत. अशा धमक्यांना घाबरून आपण उमेदवारी अर्ज मुळीच मागे घेणार नाही. मी २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, असे स्पष्ट केले आहे.