वाघाचे ‘लोटांगण’! ‘पक्ष बदलणारे’ म्हणून आधी डरकाळी फोडली; मात्र जोरगेवारांच्या प्रवेशानंतर नमती बाजू घेतली

Kishor Jorgewar Joins BJP: अनेक पक्ष बदलविणाऱ्यांना पक्षात स्थान नको, अशी डरकाळी सुधीर मुनगंटीवार यांनी फोडली होती. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश आला अन् मुनगंटीवार यांच्या हस्ते आमदार किशोर जोरगेवार यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पक्षप्रवेश पार पडताच मुनगंटीवारांचे सूर मात्र बदलले आहे.

Lipi

चंद्रपूर : अनेक पक्ष बदलविणाऱ्यांना पक्षात स्थान नको, अशी डरकाळी सुधीर मुनगंटीवार यांनी फोडली होती. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश आला अन् मुनगंटीवार यांच्या हस्ते आमदार किशोर जोरगेवार यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. तुटलेलं पाणी पुन्हा जुडलं आहे. पक्षप्रवेश पार पडताच मुनगंटीवार म्हणाले, एखाद्या पक्षात जेव्हा इतर पक्षातील लोक सामील होतात. तेव्हा पक्ष योग्य पद्धतीने पुढे जाण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांचा परिवार होतो. कार्यकर्त्यांची इच्छा होती की ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट द्यावे, याचा अर्थ असा नव्हे की, इतर नको. हा विचार मात्र नव्हता. जोरगेवार यांच्या सन्मानाची जवाबदारी माझ्यावर दिली आहे. ती मी पूर्ण करणारच आहे. आयात उमेदवार नको असा हट्ट धरलेल्या मुनगंटीवारांनी मारलेली पलटी चर्चेचा विषय ठरत आहे.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामुळे आता जोरगेवार यांना चंद्रपुरातून भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मागील काही दिवसांपासून जोरगेवार प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. शरद पवार यांच्या भेटीला ते गेले होते. पण तिथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. यात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देण्याचे आदेश पक्षाने दिले आणि त्या आदेशावर मुनगंटीवार यांनी आज अंमल केला. यावेळी हंसराज अहिर हेही काही वेळाने उपस्थित झाले.

किशोर जोरगेवार यांच्यासह महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर आणि इतर अनेकांनी प्रवेश घेतला. प्रारंभी मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या नावाला मोठा विरोध केला, पण पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागल्याचे दिसते. यामुळे मुनगंटीवार समर्थकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. हा असंतोष कसा थोपवण्यात नेत्यांना यश मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘माझी पहिली पसंती भाजप’

आमदार किशोर जोरगेवार यांची अखेर भटकंती आज थांबली आहे. त्यांच्या भटकंतीवर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. पक्षप्रवेशानंतर जोरगेवार म्हणाले माझी पहिली पसंती भारतीय जनता पार्टी होती. मी भाजपमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र राजकीय घडामोडीमुळे मला बाहेर जावे लागले. भाजपने माझ्यासोबत आज न्याय केला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

chandrapur vidhan sabhakishor jorgewar joins bjpmh vidhan sabha nivadnukpolitical drama in chandrapursudhir mungantiwarकिशोर जोरगेवारांचा भाजपप्रवेशचंद्रपुरातील राजकीय घडामोडीचंद्रपूरातील अटीतटीची लढतमहाराष्ट्र विधानसभेतील मोठ्या लढतीसुधीर मुनगंटीवारांची भूमिका
Comments (0)
Add Comment