Dhantrayodashi 2024 Upay In Marathi : धनत्रयोदशीच्या संध्याकाळी ‘या’ गोष्टी देवू नका ! माता लक्ष्मी होईल नाराज !

Dhanteras 2024: धनत्रयोदशी अर्थात आश्विन वद्य त्रयोदशी ! धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. सायंकाळी धनसंपत्ती, पैसा यांची पूजा केली जाते तसेच श्री विष्णु, माता लक्ष्मी, गणपती यांचीही ही पूजा होते. धनत्रयोदशी लक्ष्मी मातेशी जोडलेली असून या दिवशी काही खास गोष्टी कोणाला देवू नयेत. तसेच काही खास गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Dhantrayodashi 2024 Upay In Marathi : धनत्रयोदशीच्या संध्याकाळी ‘या’ गोष्टी देवू नका ! माता लक्ष्मी होईल नाराज !

Do not give these items on Dhantrayodashi: धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्या संध्याकाळी कोणालाही देऊ नयेत. समजा असे काही झाले तर माता लक्ष्मी नाराज होते आणि तुमच्या घरातून सुख समृद्धी दूर जाते. तेव्हा धनतेरच्या दिवशी कटाक्षाने या वस्तू संध्याकाळी कोणालाही देवू नका. तसेच काही खास गोष्टींची काळजी घ्या. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. ही पूजा अमावस्या संध्याकाळपर्यंत म्हणजे दिवाळीच्या दिवशीपर्यंत चालते. म्हणून काही वस्तू अशा आहेत ज्या धनतेरसच्या संध्याकाळी कोणालाही देऊ नये.

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी करु नका हे काम

धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरात माता लक्ष्मीची पूजा केली जाते. संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा, यामुळे लक्ष्मी मातेचे घरी आगमन होते. पण धनतेरच्या संध्यकाळी कोणाला पैसे उधार देणे म्हणजे माता लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखविणे असा अर्थ होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नका किंवा कोणाला उधारी देवू नका. असे केले तर आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे.

धनत्रयोदशीला ही वस्तू दिली तर अनर्थ

एक वस्तू अशी आहे जी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही कोणाला दिली तर माता लक्ष्मी नाराज होते असे म्हणतात. ती वस्तू म्हणजे झाडू ! झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे. धनतेरसला तुम्ही संध्याकाळी कोणाला झाडू दिला तर घरातील सुख समृद्धी कमी होते. म्हणून शक्यतो दिवाळीच्या दिवसात कोणालाही आपल्या घरातील झाडू देऊ नये. अनेक ठिकाणी लोक या दिवशी खास झाडूची खरेदी करतात.

धनत्रयोदशीला या वस्तू दिल्या तर वाढेल अशुभ प्रभाव

आपले शेजारी काही गोष्टी मागायला येतात किंवा आपणही त्यांच्याकडे काही वस्तू मागायला जात असतो. पण लक्षात ठेवा धनत्रयोदशीच्या दिवशी तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये कांदा-लसूण देणे टाळावे. याचा संबंध थेट केतु ग्रहाशी असल्यामुळे अशुभ प्रभाव वाढू शकतो. म्हणूनतर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कांदा- लसूण देणे टाळावे.

धनत्रयोदशीच्या दिवशी ही चूक करू नका

माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झालेली आहे तसेत मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून तयार होते. त्यामुळे मीठाचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे. धनतेरच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोणाला मीठ देवू नका. असे झाले तर घरातील सुखसमृद्धी कमी होवू शकते. खरंतर कोणत्याही दिवशी संध्याकाळी मीठ कोणालाच देवू नये. यामुले राहूचा प्रकोप वाढतो.

धनत्रयोदशीला ही वस्तू दिली तर माता लक्ष्मी होईल नाराज

मीठाप्रमाणे साखरही संध्याकाळी कोणाला देवू नये. धनत्रयोदशी तसेच दिवाळीच्या कोणत्याही दिवशी साखरेचे दान किंवा साखर उधार देवू नये. दिवाळीच्या लोककथेत सांगितले आहे, माता लक्ष्मीला ऊस फार प्रिय आहे. या ऊसामुळेच माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केला होता. तसेच साखर ऊसापासून तयार होते. म्हणून धनतेरच्या दिवशी साखरेचे दान म्हणजे घरातील लक्ष्मी निघून जाणे असा अर्थ आहे.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Dhanteras 2024 totke upay in marathiDhanteras Dhan ke totke in marathiDhanteras kya na karen in marathiDhantrayodashi 2024 Dhan upaydiwali 2024धनत्रयोदशी 2024या गोष्टी दान करू नका
Comments (0)
Add Comment