खरी शिवसेना कोणाची? येथे मतदार करणार फैसला; बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

Parbhani Vidhan Sabha News : ज्या परभणी जिल्ह्याने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिले, त्याच परभणी विधानसभा मतदारसंघात खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे. शिवसेना उबाठा गटाच्या आमदार राहुल पाटील यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आनंद भरोसे यांनी दंड थोपटले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

धनाजी चव्हाण, परभणी : दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेत फूट पडली. पण परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना एक संघ राहिली. परभणी जिल्ह्यातील आमदार-खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे समोर येणार आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील करत आहेत. त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे, पण त्यांच्याविरुद्ध आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद भरोसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आनंद भरोसे हे मुळात भाजपचे असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या दरबारामध्ये खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे. आज आनंद भरोसे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Pune News : भोसरी विधासभेसाठी विलास लांडे ठरणार जायंट किलर, अजितदादांचा शिलेदार शरद पवारांचा प्रचार करणार
परभणी जिल्हा हा मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. मागील २५ वर्षांपासून परभणी जिल्ह्यात खासदार आणि परभणी विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच राहिला आहे. शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांना त्यात अपयश आलं. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन नवी फळी उभी करण्याचे काम केले.
Gopichand Padalkar : माझी ही शेवटची निवडणूक…. मला एकदा निवडून द्या, गोपीचंद पडळकरांची भावनिक साद
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा धनुष्यबाणाला सोडून घ्या असा आग्रह धरला होता. पण ते शक्य झाले नाही त्यामुळे जनतेच्या मनात खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होऊ शकला नाही.

परभणी जिल्ह्यात निवडणुकांमधून धनुष्यबाण जर नाहीसा झाला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी मागणी शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरून काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी विधानसभेची जागा भाजपकडे असतानाही शिवसैनिकांच्या आग्रहाखतर शिवसेनेला सोडवून घेतली. पण उमेदवार कोण द्यायचा याची चाचपणी सुरू असतानाच २०१४ मध्ये भाजपकडून लढलेल्या आनंद भरोसे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली.
Imtiaz Jaleel : लोकसभेनंतर महाविकास आघाडी मोठ्या भ्रमात, विधानसभेला फटका बसणार; इम्तियाज जलीलांचा टोला
आनंद भरोसे यांचा काल मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेण्यात आला. प्रवेश केल्यानंतर त्यांना तात्काळ परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देखील देण्यात आली. आनंद भरोसे यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून असलेले उमेदवार डॉ. राहुल पाटील यांच्या विरोधात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आनंद भरोसे हे निवडणूक लढणार आहेत.

खरी शिवसेना कोणाची? येथे मतदार करणार फैसला; बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना परभणी विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही कस लागणार आहे. जनतेच्या दरबारात खरी शिवसेना कोणाची याचा देखील फैसला आता होणार आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून आता मोर्चे बांधणी जोरात होताना दिसत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात या मतदारसंघात घमासान होणार हे आता स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा हा बालेकिल्ला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी आग्रही राहणार आहेत. मात्र आता परभणी विधानसभा मतदारसंघात खरी शिवसेना कोणाची याचा फैसला जनता मतदानाच्या रूपाने करणार आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Parbhaniparbhani shiv sena candidateparbhani vidhan sabha candidateparbhani vidhan sabha constituencyपरभणी ठाकरे गट आमदार राहुल पाटीलपरभणी बातमीपरभणी विधानसभा मतदारसंघपरभणी शिंदे गट आनंद भरोसे उमेदवारपरभणी शिवसेना विरुद्ध शिवसेना
Comments (0)
Add Comment