राष्ट्रवादीचे जास्त आमदार असताना मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, आता कसलं घेणार… इस्लामपुरात अजित पवार बरसले

Ajit Pawar on Jayant Patil: निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा इस्लापूरचे उमेदवार जयंत पाटील यांना घेरले आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शक्यतेवरुनही जयंत पाटलांसोबत शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधानस़भा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून राजकीय व्यासपीठावरुन आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे. अजित पवारांनी आज महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी इस्लामपूरात हजेरी लावली होती. निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा इस्लापूरचे उमेदवार जयंत पाटील यांना घेरले आहे. ‘राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय काम केलं? त्या संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का त्याचा लोकांना फायदा झाला का?’ असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी जयंत पाटलांना घेरले आहे. तसेच २००४ ला राष्ट्रवादीचे अधिक आमदार असताना मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि आता संख्याबळ नसताना मुख्यमंत्रीपद कसलं घेणार, अशी खोचक टीकाही अजितदादांनी शरद पवारांनी केली आहे.

जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडत अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रमाने बंधू भगिनींना पैसे मिळणार नाहीत, तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. करेक्ट कार्यक्रम करणं त्याच्या हातात नाही. जनतेच्या हातात आहे कोणाचा कार्यक्रम करायचं आहे ते.

इस्लापुरात याआधीपासून घड्याळाला मतदान केलंय आता पण घड्याळालाच मतदान करा. परंपरा मोडीत काढायची नाहीये, बाकीचे येतील, जातील, मोडीत काढतील त्यांनाच लखलाभ, असा जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. मोदींच्या विचारांचं सरकार आलं तर राज्याच्या अर्थकारणाला लाभ होणार आहे, असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे.

अजित पवारांनी पुढे लाडक्या योजनांचा आधार घेत लाडक्या मतदारांना साद घातली. घड्याळ, कमळ आणि धन्युषबाणासमोरील बटण दाबा योजना चालू, मात्र दुसरं दाबलं की योजना बंद. काय करायचं ते तुम्ही ठरवा, असे अजित पवार म्हणाले. तर ‘शेतकऱ्यांचं बील माफ करायला धाडस लागतं. हे कोणी केलं नाही. यासाठी प्रशासनावर पकड लागते,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘नुकताच झालेल्या सभेतून असं कळालं म्हणे सांगलीला मुख्यमंत्रीपद मिळणार, पण या केवळ थापा आहेत, असा टोलाही अजित पवारांनी जयंच पाटील यांना लगावला आहे. २००४ ला राष्ट्रवादीचे ७१ आणि काँग्रेसचे ६९ आमदार होते तरी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते जाऊन दिल्लीत म्हणाले आम्हाला मुख्यमंत्रीपद नकोय. जेव्हा जास्त आमदार तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि आता संख्याबळ नसताना मुख्यमंत्री कसलं घेणार,’ अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य चर्चेवरुन शरद पवारांना चिमटा काढला आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

ajit pawarislampur mva candidateislampur vidhan sabhaJayant Patilncp sharad pawarअजित पवारांचा आरोपइस्लामपूरातील राजकीय स्थितीजयंत पाटील यांच्यावर टीकाशरद पवारांची राष्ट्रवादी
Comments (0)
Add Comment