Nanded News: नांदेड उत्तरची जागा काँग्रेसच्या वाटेला आली आहे. २०१९ मध्ये या जागेवर शिवसेनेनं निवडणूक लढवली होती. यंदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हायलाइट्स:
नांदेडमध्ये महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?
काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असताना, ठाकरे गटाने उमेदवाराला दिला एबी फॉर्म
काँग्रेससह निष्ठावंत शिवसैनिकांचा विरोध
अर्जुन राठोड, नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. याचाचं प्रत्यय सध्या नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून उमेदवारी बहाल झाली असताना शिवसेना ठाकरे गटाने एका महिला उमेदवाराला चक्क एबी फॉर्म दिले. संगिता पाटील डक या महिला उमेदवाराने पक्षाचे एबी फॉर्म जोडून नांदेड उत्तर मतदार संघातून अर्ज दाखल केला. मात्र ही बाब समजल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी विरोध केला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून एबी फॉर्म रद्द करण्याची विनंती केली. या प्रकाराने नांदेडमध्ये महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय जागा वाटपामध्ये मविआमध्ये समन्वय नसल्याने दिसून येत आहे.नांदेड उत्तरची जागा काँग्रेसच्या वाटेला आली आहे. २०१९ मध्ये या जागेवर शिवसेनेनं निवडणूक लढवली होती. यंदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय काँग्रेसमधून आलेल्या संगिता पाटील डक यांनी ही शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती, पण ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. नांदेड उत्तरच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात शेवटच्या टप्यापर्यंत रस्सीखेच सुरू होती. अखेर ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली होती. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर केली. सोमवारी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी दाखलही केली. असं असताना मंगळवारी संगिता पाटील डक यांनी शिवसेना ठाकरे गटाचा बी फॉर्म जोडून उमेदवारी दाखल केली. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी विरोध केला, दुसरीकडे शिवसेनेच्या या खेळीनंतर काँग्रेसचंही टेन्शन वाढलं आहे. या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. Sharad Pawar: तुला बघून घेईन, वंचितच्या उमेदवाराला धमकी, कागदपत्रं भिरकावली, पवार गटाच्या उमेदवारावर गुन्हा
फॉर्म रद्द करण्याचे पत्र व्हायरल
दरम्यान, संगिता पाटील डक यांना शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आवश्यक असलेले फॉर्म ‘अ’ आणि ‘ब’ देण्यात आलेले रद्द करण्यात यावेत, अशा विनंतीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर या पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आता या पत्रानुसार संगिता पाटील डक यांची ठाकरे गटाची उमेदवारी कायम राहणार की रद्द होणार की काँग्रेसकडून अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाकडून संगीता पाटील लढणार हे पाहावे लागणार आहे.
ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार
शिवसेना (उबाठा) पक्षाकडून बी फॉर्म सोमवारी मिळाला असून ही निवडणूक मी लढविणार आहे असं संगीता पाटील डक स्पष्ट केले. एबी फॉर्म बाबत पक्षाकडून गोपनियता पाळण्यात आली असून सध्या जाहीर झालेल्या उमेदवाराबद्दल मला काही माहिती नाही असं त्या म्हणाल्या. त्यामुळे नांदेड उत्तर मतदार संघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आमने सामने असणार आहेत
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा