आजचे अंकभविष्य, 31 ऑक्टोबर 2024: नरकचतुर्दशी ! सकारात्मक विचारांमध्ये वाढ ! रखडलेले पेमेंट होणार ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 31 October 2024 : 31 ऑक्टोबर, गुरूवार, आज नरकचतुर्दशी तसेच लक्ष्मीपूजन असून सर्व मुलांकांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. दिवाळी म्हणजे प्रकाश आणि दिव्यांचा सण आणि आपण सदैव प्रकाशाच्या दिशेने वाटचला करायला हवी. सगळ्यांच्या जीवनात ही दिवाळी आनंद उत्साह घेवून येवो. मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुमचा मानसिक त्रास कमी होणार आहे. मूलांक 2 च्या लोकांनी भावूक होवून निर्णय घेवू नये. मूलांक 4 च्या जातकांनी नकारात्मक विचाराच्या लोकांपासून दूर रहावे. मूलांक 6 साठी व्यापार वाढीचे नवे मार्ग सापडतील. मूलांक 7 च्या लोकांना ऑफिस आणि घरी कटू अनुभवाची शक्यता आहे. मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला असून सगळी कामे मार्गी लागणार आहेत. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 31 ऑक्टोबर 2024: नरकचतुर्दशी ! सकारात्मक विचारांमध्ये वाढ ! रखडलेले पेमेंट होणार ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 31 October 2024: 31 ऑक्टोबर, दिवाळी सुरू झाली असून आज नरकचतुर्दशी तसेच लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. आज गुरूवार असू भगवान विष्णु यांची पूजा केली जाते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु यांचा आशिर्वाद सर्व मुलांकावर राहणार आहे. दिवाळीच्या दिवसात तुमचा आनंद द्विगुणीत होणार असून कार्यक्षेत्रात लाभ आहे. मूलांक 1 सह या मूलांकांची आर्थिक स्थिती उत्तम असेल. मूलांक 3 सह या मूलांकांचे सकारात्मक विचार अधिक वाढणार आहेत. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुमचा मानसिक त्रास कमी होणार आहे. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असून धनलाभाचा योग आहे. तुमचे रखडलेले पेमेंट अचानक मिळू शकते. तुम्ही क्रीडा क्षेत्रात असाल तर तुम्हाला उत्तम यश मिळेल. कुटुंबात वातावरण आनंदी असून जोडदारासोबत संबंध अधिक दृढ होतील.

मूलांक 2 – भावूक होवून निर्णय घेवू नका

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही प्रगतीचे नवे मार्ग शोधणार आहात. तुम्ही भावुक स्वभावाचे आहात पण अती भावूक होणे चांगले नाही. कुटुंब आणि कार्यस्थळी अती भावूक होवून निर्णय घेवू नका त्यामुळे नुकसान सोसावे लागेल. आज तुम्ही जे काही बोलाल त्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. तुमचे बोलणे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबात वातावरण चांगले असून जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे.

मूलांक 3 – दानधर्म करा, सकारात्मक विचार लाभदायक

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या ऐपतीनुसार दानधर्म करा. तुमचे विचार आज सकारात्मक असतील. तसेच आज अशा काही लोकांसोबत भेटी होतील जे तज्ज्ञ असून तुमच्यासाठी लाभदायक असतील. व्यापारात धनलाभ आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या निर्णयाचे स्वागत करेल तसेच जोडीदाराची भक्कम साथ तुम्हाला मिळेल.

मूलांक 4 – नकारात्मक विचाराच्या लोकांपासून दूर राहा

मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमचे विचार आणि बोलणे यात थोडी नकारात्मक भावना असेल. ऑफिस किंवा घरी जर कोणी नकारात्मक बोलत असेल तर त्यापासून दूर राहा. आज काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारात कामे वाढतील त्यांचे योग्य नियोजन करा. कुटुंबासोबत संबंध चांगले असतील तसेत जोडीदारासोबत नाते अधिक वृद्धींगत होईल.

मूलांक 5 – तब्येत सांभाळा, वादविवादापासून दूर राहा

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. व्यवसायात नवीन प्रोजेक्टवर काम करताना अडचणींचा सामना करावा लागतोय पण टेन्शन घेवू नका, तुम्ही अडचणीतू मार्ग काढणार आहात. तब्येतीची खास काळजी घ्यायला हवी कारण पोटाशी संबंधित आजार वाढणार आहेत. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल पण जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. वादविवाद झाला तर तुम्ही शांत राहा आणि सौम्य भाषेचा वापर करा.

मूलांक 6 – व्यापार वाढीचे नवे मार्ग सापडतील

मूलांक 6 साठी आजचा दिवस चांगला असून व्यापार वाढविण्यासाठी तुम्हाला नवे मार्ग सापडतील. जे तुम्हाला भविष्यात धनलाभ करून देतील. आर्थिक दृष्ट्या दिवस सामान्य असून गुंतवणुकिचा विचार करू शकता. कुटुंबासोबत एकत्रितपणे मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात. जोडीदारासोबत संबंध चांगले असतील. घरातील वातावरण उत्तम असेल.

मूलांक 7 – ऑफिस आणि घरी कटू अनुभवाची शक्यता

मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. ऑफिस आणि घरी तुम्हाला कटू अनुभव येण्याची शक्यता आहे. तुमचे विचार करताना सावध आणि सतर्क राहा. तुम्ही नक्की काय बोलताल याचा विचार करा. आज कोणी सल्ला मागितला तरच द्या, उगाचच कोणाच्याही वादात पडू नका. जोडीदाराचा आदर करा तसेच काही गिफ्ट घेवून जा त्यामुळे काही नाराजी असेल तर ती कमी होईल.

मूलांक 8 – अती राग घातक, शांत राहण्याचा प्रयत्न करा

मूलांक 8 साठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. आर्थिक दृष्ट्या दिवस ठिक आहे, पण गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकला. व्यापारात कामाचा ताण वाढणार आहे. मुलांच्या भविष्याबद्दल तुमची काळजी वाढेल. आज तुमची काही कामे रखडल्यामुळे तुमची चिडचिड वाढेल, पण अती राग तुमच्यासाठी घातक आहे. तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 9 – रखडलेले पेमेंट होणार, कामे मार्गी लागणार

मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही विचार केलेली सगळी कामे मार्गी लागणार आहेत. तुमचे रखडलेले पेमेंट झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबासोबत तुमचा वेळ व्यतीत करणार आहात. तसेच जोडीदारासोबत फिरायला जाणार आहात. एकूण दिवस चांगला असून तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागता येणार आहे.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

31 ऑक्टोबर 2024 कसा असेल माझा दिवस?Aaj che Ank Jyotish 31 October 2024Numerology 31 October 2024 horoscopeNumerology Horoscope In Marathi 31 OctoberToday's Numerology 31 October prediction October in marathitodays horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्यानोकरी मिळणार का?राशी भविष्य
Comments (0)
Add Comment