दिशा सालियान मृत्यू प्रकरण, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर अमित पहिल्यांदाच बोलले

Amit Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून टीका केली जाते. त्यासोबतच अभिनेता सुशांत सिंहची हत्या झाली असून त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप राणेंनी केला होता. या प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनीआपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेकदा दिशा सालियान प्रकरणावरून आरोप केले जातात. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह यांचाही मृत्यूमागे आदित्य ठाकरेंचा हात असल्याचं आरोप भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकदा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सुशांत सिंह याने कोरोना काळात राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंहची हत्या झाल्याची गंभीर टीका राणेंनी अनेकदा केली आहे. या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमची आता मैत्री आणि संवाद नाही, समोर आल्यावर हाय बोलेल पण संवाद होणार नाही. २०१७ वेळी खरं काय आणि खोटं काय हे आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही परिवार आणि नाती म्हणून पथ्य पाळतो, मला पण वाटतं आदित्यचा दिशा सालियान प्रकरणामध्ये समावेश नसेल. मर्डरवगरे लेव्हलला तो जाईल असं मला वाटत नाही, हे माझं मत आहे, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आमच्या पक्षाची बैठक सुरू होती तेव्हा मला वाटलं की माझा कुठे फायदा होणार असेल तर मी तयार असल्याचं सांगितलं. मलासुद्धा यादी येईपर्यंत माहित नव्हतं की माहीममधून लढणार आहे. हा निर्णय साहेबांचा (राज ठाकरे) होती. मला अपेक्षा होती उद्धव ठाकरे उमेदवार देतील. साहेब नाती जपण्याचा निर्णय घेतात, आम्ही यावर्षीसुद्धा उमेदवार देणार नव्हतो पण कुठेही काम दिसलं नाही, लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे तिथे आम्ही वरळीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं.

कोण समोर असेल नसेल माझी तयारी आहे. जर राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल बोलत असतील तर माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तेव्हा मला काय राज ठाकरेंनाही माहिती नव्हतं की मी निवडणुकीला उभा राहणार आहे. त्यामुळे लोकसभेला परतफेड मिळावी म्हणून पाठिंबा दिलेला नव्हता, असंही अमित ठाकरे म्हणाले.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

aaditya thackerayAmit Thackeraydisha saliyan caseMNS Leader Amit Thackerayअमित ठाकरेआदित्य ठाकरेदिशा सालियान मृत्यू प्रकरण
Comments (0)
Add Comment