Manoj Jarange Patil And Dilip Sopal Meet : उबाठा गटाचे दिलीप सोपाल यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
बार्शीत जरांगे फॅक्टर चालणार?
बार्शी विधानसभा मतदारसंघात लिंगायत आणि मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे बार्शीत जरांगे फॅक्टर चालणार की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी जरांगे पाटीला यांना चॅलेंज केलं होतं, त्यामुळे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे आमने – सामने आले होते.
जरांगे पाटील आणि दिलीप सोपल यांच्या भेटीला महत्त्व आले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपल आणि जरांगे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभ्या असलेल्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांची समाजात मोठी लोकप्रियता आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा, मराठा समाजासाठी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी आमदार दिलीप सोपल यांनी या भेटीत मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोपल आणि जरांगे पाटील यांच्या संवादाचा परिणाम मतदारांवर आणि विशेषतः मराठा समाजावर कसा होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Solapur News : उबाठा गटाच्या उमेदवाराची मनोज जरांगेंशी भेट, बार्शीतील राजकीय समीकरणं बदलतील? चर्चांना उधाण
सोपल आणि जरांगे यांच्यात झालेल्या संवादाची उत्सुकता
दिलीप सोपल आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नेमका काय संवाद झाला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीमुळे आगामी निवडणुकीत मराठा समाजाचा कौल कसा असेल, तसंच या चर्चेचा राजकीय परिणाम कितपत प्रभावी ठरेल, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. सोपल आणि जरांगे पाटील यांच्या भेटीची सध्या एकच चर्चा आहे.