Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उबाठा गटाच्या उमेदवाराची मनोज जरांगेंशी भेट, बार्शीतील राजकीय समीकरणं बदलतील? चर्चांना उधाण

5

Manoj Jarange Patil And Dilip Sopal Meet : उबाठा गटाचे दिलीप सोपाल यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इरफान शेख, सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) विधानसभा निवडणूक उमेदवार दिलीप सोपल यांनी त्यांची भेट घेतली. दिलीप सोपल यांनी जरांगे पाटील यांच्या भेट घेतली तेव्हा या भेटीत मराठा समाजातील सहकाऱ्यांसह सहभाग होता. दिलीप सोपल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने बार्शी तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बार्शीत जरांगे फॅक्टर चालणार?

बार्शी विधानसभा मतदारसंघात लिंगायत आणि मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे बार्शीत जरांगे फॅक्टर चालणार की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी जरांगे पाटीला यांना चॅलेंज केलं होतं, त्यामुळे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे आमने – सामने आले होते.
भोकरमधून अर्ज भरणाऱ्या अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर

जरांगे पाटील आणि दिलीप सोपल यांच्या भेटीला महत्त्व आले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपल आणि जरांगे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभ्या असलेल्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांची समाजात मोठी लोकप्रियता आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा, मराठा समाजासाठी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी आमदार दिलीप सोपल यांनी या भेटीत मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोपल आणि जरांगे पाटील यांच्या संवादाचा परिणाम मतदारांवर आणि विशेषतः मराठा समाजावर कसा होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Supriya Sule : पक्षासोबतच पवारांच्या पाडव्यातही फूट? पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा दिवस, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Solapur News : उबाठा गटाच्या उमेदवाराची मनोज जरांगेंशी भेट, बार्शीतील राजकीय समीकरणं बदलतील? चर्चांना उधाण

सोपल आणि जरांगे यांच्यात झालेल्या संवादाची उत्सुकता

दिलीप सोपल आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नेमका काय संवाद झाला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीमुळे आगामी निवडणुकीत मराठा समाजाचा कौल कसा असेल, तसंच या चर्चेचा राजकीय परिणाम कितपत प्रभावी ठरेल, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. सोपल आणि जरांगे पाटील यांच्या भेटीची सध्या एकच चर्चा आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.