Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

December 2024 Planet Transits : डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळसह 4 ग्रहांचे संक्रमण ! मकरसह या 5 राशींचा भाग्योदय ! करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नफा

4

December 2024 Grah Gochar : डिसेंबर वर्षाचा अखेरचा महिना असून ग्रहांच्या राशी परिवर्तनासाठी आणि संक्रमणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात शुक्र दोन वेळा राशी परिवर्तन करेल तर बुध पुन्हा मार्गी होईल. मंगळही वर्षाच्या शेवटी वक्री होईल तर सूर्यही धनुमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे शुभ प्रभावात वाढ होईल. एकूणच वर्षाच्या शेवटी सूर्य आणि मंगळसह ४ ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे वृषभ आणि मकरसह 5 राशींची वर्ष संपण्याआधीच भरभराट होईल तसेच करियरमध्ये नवे संधी, व्यवसायात प्रगती आणि घरात सुखसमृद्धीचे योग तयार होतील. चला तर मग, डिसेंबर महिन्यातील ग्रह परिवर्तन आणि संक्रमणाचा कोणत्या राशींवर किती प्रभाव पडणार आहे ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
December 2024 Planet Transits : डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळसह 4 ग्रहांचे संक्रमण ! मकरसह या 5 राशींचा भाग्योदय ! करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नफा

December 2024 Grah Gochar Rashifal : डिसेंबर महिना ग्रहांच्या राशी परिवर्तनासाठी आणि संक्रमणासाठी महत्त्वाचा आहे. या महिन्यात सूर्य आणि मंगळसह ४ ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्वप्रथम २ डिसेंबरला शुक्र मकर राशीमध्ये संक्रमण करेल त्यानंतर ७ डिसेंबरला मंगळ कर्क राशीमध्ये वक्री होईल. १५ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुध वृश्चिक राशीत पुन्हा मार्गी होणार आहे. सर्वांत शेवटी शुक्र २८ डिसेंबरला कुंभमध्ये संक्रमण करेल. २०२४ संपण्याआधी शुक्र आणि शनी यांची युती होईल आणि मिळकतीसाठी अनेक संधी मिळतील. चला, पाहूया डिसेंबर महिन्यात मकर आणि वृषभसह इतर कोणत्या राशींना धनलाभ होणार असून डिसेंबरच्या

मेष राशी : प्रगतीचे शुभयोग

मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना शुभ योगांनी भरलेला आहे. या महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. सामाजिक संपर्क वाढेल तसेच नवीन ओळखी होतील ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल आणि त्यात तुमचाच फायदा आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून हा महिना उत्तम आणि फायदेशीर आहे. तुमची भरपूर प्रगती होणार आहे.

वृषभ राशी : पुढे जाण्याच्या संधी मिळेल

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील. तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक संधी येणार आहेत, त्याचा लाभ घ्या. वर्षाच्या शेवटी परदेशात जाण्याचे योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे पण जोडीदारासोबत वाद घालू नका. वाढत्या कामामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देवू शकणार नाही त्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होईल.

सिंह राशी : करियरमध्ये चांगले परिणाम दिसतील

सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम देणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचे योग आहेत. तसेच धनप्राप्ती उत्तम असून बँक बॅलन्स वाढणार आहे. लवलाइफ चांगली असून नाते वृद्धींगत होईल. तुमची तब्येत उत्तम राहणार आहे. घरातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील.

मकर राशी : करिअरमध्ये उत्तम प्रगती

मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात करियरच्या दृष्टीने फलदायी असेल. करियरमध्ये तुम्ही उत्तम प्रगती करून पुढे जाणार आहात. कामाच्या निमित्ताने प्रवास होणार आहे त्याचा लाभ घ्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी कालावधी उत्तम असून नफा जास्त होणार आहे. कामाला पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता.

मीन राशी : प्रगतीचे नवीन मार्ग दिसतील

मीन राशीसाठी डिसेंबर महिना उत्तम असून वर्षाच्या शेवटी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक काम तुम्ही कराल. जे लोक भागिदारीत काम करत आहेत त्यांचे पार्टनरसोबतचे संबंध चांगले राहतील. हा कालावधी आरोग्याच्या दृष्टीनेही वेळ अनुकूल आहे. तुमच्यासाठी शुभ संकेत असून भरभराटीचे योग तयार होत आहेत.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.