उदय सामंत ॲक्शन मोडवर, रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का; मतदारसंघात काय घडलं?

Ratnagiri Shiv Sena News: रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उदय सामंत यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर हा धक्का दिला आहे. रत्नागिरीत मतदारसंघात काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रत्नागिरी उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, गीता शिंदे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत पाली येथे हा मोठा पक्षप्रवेश झाला असून त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा भगवा हाती घेतला आहे.
Ratnagiri News : स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प जबरदस्तीने केला जाणार नाही, बारसू रिफायनरीबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने नाराज होते. ठाकरे यांनी बाळ माने यांना उमेदवारी दिल्यानंतर बने यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी दोन उदय एकत्र आले तर चांगली विकासाची कामे अधिक जोमाने आम्ही करू शकतो असं मोठे सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश ठाकरे गटाला पहिला मोठा धक्का मानला जात आहे.
Raigad News : ‘तो’ दोन कोटींचा व्हायरल चेक ठरतोय कळीचा मुद्दा, धरणग्रस्तांना मोबदल्याची इतकीच रक्कम? चर्चेला उधाण
रत्नागिरी येथील महिला पदाधिकारी संध्या कोसुमकर या ठाकरे गटाच्या डॅशिंग महिला पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आता त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीला मोठे बळ मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रत्नागिरी, पाली येथे शेकडो महिलांनी उबाठा पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवसेना ही महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवा, शिवसेना आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल असा विश्वास प्रवेश केलेल्या या महिला पदाधिकाऱ्यांना सामंत यांनी दिला आहे.
भोकरमधून अर्ज भरणाऱ्या अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर

काय घडलं रत्नागिरी मतदारसंघात?

रत्नागिरी विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यावर त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून उदय बने हे प्रबळ दावेदार मानले जात होते. शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांनीही उदय बने यांच्या उमेदवारीचे सूतोवाच अनेकदा यापूर्वी केलं होतं. उदय बने हे जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ही उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं, मात्र आम्ही ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते होतो, मात्र त्याचं फळ आम्हाला मिळालं, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
Supriya Sule : पक्षासोबतच पवारांच्या पाडव्यातही फूट? पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा दिवस, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात असलेले उदय बने यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार बाळ माने यांना राजकीयदृष्ट्या रोखण्यासाठी उदय सामंत आणि त्यांचे पदाधिकारी जोमाने सक्रिय झाले असून उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेत ठाकरे गटाला मोठे धक्के देण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे.

Ratnagiri News : उदय सामंत ॲक्शन मोडवर, रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का; मतदारसंघात काय घडलं?

या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

यावेळी उबाठा उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, विभाग प्रमुख गीता शिंदे यांच्यासह शुभांगी जोशी, शिल्पा दुडे, प्रतिभा उतेकर, शलाखा मांडवकर, रुचिता डेपसे, रोहिणी नलावडे श्रद्धा झगडे रुपाली धामनस्कर, राजश्री सावंत, श्वेता फाळके, दीपाली जाधव, धनश्री कुष्टे, संस्कृती नागवेकर, संचिता कदम, आरती सावंत, शुभांगी पवार, वैशाली वालम, मुमताज मस्कर, आसिया साखरकर, हनिफा मिरकर, आरिफा पावसकर, जुबेदा बुडिए, साखिफ पावसकर, रुक्साना चाहूस, रेश्मा बोरनकर, रिया कोसुमकर, प्रियांका कोसुमकर, प्रियांका फडतडे, आरोही पवार, फातिमा मिरकर, हालिमा मस्तान, नसीमा मस्तान, बक्षूनिसा बुडिए, निलीफर फणसोपकर, मिसबा उतेकर, पर्विणा दरवेश, तस्सिया मुस्कान मस्कर, सोना गवळी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Ratnagiri newsratnagiri sindhudurgratnagiri vidhan sabha constituencyratnagiti ubt shiv senaUday Samantउदय सामंतरत्नागिरी ठाकरे गटाला धक्कारत्नागिरी महिला पदाधिकारी शिंदे गटात प्रवेशरत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment