Sanjay Raut: ज्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतात. परंतु ज्या ठिकाणी संकट असते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी नसतात. गृहमंत्री नसतात. कश्मीरमध्ये संकट असताना ते गेले नाही.
हायलाइट्स:
- भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ शब्द वापरला होता
- रविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे
- संजय राऊतांकडून सावंतांच्या वक्तव्याचं समर्थन
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाही. एकीकडे आमची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना कोणापासून धोका आहे, हे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगायला हवे. त्यासाठी हवे तर त्यांनी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर युक्रेन किंवा इस्त्रायल हल्ला करणार आहे की काय? फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का? ज्यांनी त्यांना काही आश्वसने दिली होती तो पूर्ण झाला नाही, त्यांच्यापासून धोका आहे का? असा उपाहासात्मक टोला संजय राऊत यांनी लगावला.