Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ शब्द वापरला होता, संजय राऊतांकडून सावंतांच्या वक्तव्याचं समर्थन

5

Sanjay Raut: ज्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतात. परंतु ज्या ठिकाणी संकट असते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी नसतात. गृहमंत्री नसतात. कश्मीरमध्ये संकट असताना ते गेले नाही.

हायलाइट्स:

  • भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ शब्द वापरला होता
  • रविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे
  • संजय राऊतांकडून सावंतांच्या वक्तव्याचं समर्थन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अरविंद सावंत शायना एन सी

मुंबई : मुंबई : सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी भाजप नेते कोणत्या भाषेत बोलले होते, ते जरा चेक करा. भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला होता. त्यावेळी आक्षेप घेतला गेला नाही. आता शायना एन.सी. यांच्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला त्याचा अर्थ बाहेरुन आयात केलेला व्यक्ती असा आहे. त्या स्थानिक उमदेवार नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी केलेलं वक्तव्य गंभीर नाही. अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असं संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे होणाऱ्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ज्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतात. परंतु ज्या ठिकाणी संकट असते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी नसतात. गृहमंत्री नसतात. कश्मीरमध्ये संकट असताना ते गेले नाही. मणिपूरमध्ये संकट असताना ते गेले नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले. मुंबईतील माहीम, दादार हा भाग शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येईल, असं राऊत यांनी आत्मविश्वास दाखवला.
Eknath Shinde : राज ठाकरेंना रणनीती विचारलेली, त्यांनी परस्पर उमेदवारच दिला, माहीममध्ये माघार नाही, शिंदेंची स्पष्टोक्ती

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाही. एकीकडे आमची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना कोणापासून धोका आहे, हे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगायला हवे. त्यासाठी हवे तर त्यांनी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर युक्रेन किंवा इस्त्रायल हल्ला करणार आहे की काय? फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का? ज्यांनी त्यांना काही आश्वसने दिली होती तो पूर्ण झाला नाही, त्यांच्यापासून धोका आहे का? असा उपाहासात्मक टोला संजय राऊत यांनी लगावला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.