Sharad Pawar on Yugendra Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी हायव्होल्टेज लढत होणार आहे. अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार घरातील उमेदवार का दिला याबाबत शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
युगेंद्र पवार या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली कारण हे पहिल्यांदा होत नाही. सुप्रिया यांच्या वेळेसही असंच झालं. (सुनेत्रा पवारांना उमेदवारी) अशी निवडणूक झाल्यावर लोकांची भूमिका काय असते ते महत्त्वाचं आहे. सुप्रियाच्या निवडणुकीत एक टप्पा झाला आता दुसरा टप्पा असल्याचं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला होता, आता विधानसभेला बारामतीकर कोणाला गुलाल उधळायची संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी पक्षाच्या आर्थिक सहाय्य होत असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज्याचा आचार संहिता असल्यामुळे ठिक-ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केली असून गाड्यांची तपासणी करत आहे. पोलिसांना अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपयांच्या रक्कम जप्त केली आहे. यादरम्यान शरद पवार यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते जातीयवादी असल्याचं म्हटलं होतं. शरद पवारांनी ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी जातीयवाद केल्याचं महाराष्ट्रात एक उदारण दाखवा, ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलेच नाही, वक्तव्ये केली, त्यांच्या वक्तव्यांवर आपण काय भाष्य करायचं. महाराष्ट्राची जनता शहाणी आहे, त्यांना एकच जागा दिल्याचं शरद पवार म्हणाले.