Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बारामतीमध्ये दादांविरोधात युगेंद्र पवारच का? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

10

Sharad Pawar on Yugendra Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी हायव्होल्टेज लढत होणार आहे. अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार घरातील उमेदवार का दिला याबाबत शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागांवर हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यावर यंदाच्या निवडणुकीमध्ये काही जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत. मात्र बारामतीमध्ये सर्वात तगडी लढत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्यात पाहायला मिळणार आहे. अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार असले तरी ही लढत काका-पुतण्यामध्ये असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अशातच गोविंदबागमधील पत्रकार परिषदेमध्ये युगेंद्र पवारांच्या नावाची घोषणा करत घरातील सदस्यालाच उमेदवारी का दिली? दिला असा सवाल पत्रकाराने पवारांना केला होता. यावर शरद पवार यांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.

युगेंद्र पवार या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली कारण हे पहिल्यांदा होत नाही. सुप्रिया यांच्या वेळेसही असंच झालं. (सुनेत्रा पवारांना उमेदवारी) अशी निवडणूक झाल्यावर लोकांची भूमिका काय असते ते महत्त्वाचं आहे. सुप्रियाच्या निवडणुकीत एक टप्पा झाला आता दुसरा टप्पा असल्याचं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला होता, आता विधानसभेला बारामतीकर कोणाला गुलाल उधळायची संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी पक्षाच्या आर्थिक सहाय्य होत असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज्याचा आचार संहिता असल्यामुळे ठिक-ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केली असून गाड्यांची तपासणी करत आहे. पोलिसांना अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपयांच्या रक्कम जप्त केली आहे. यादरम्यान शरद पवार यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते जातीयवादी असल्याचं म्हटलं होतं. शरद पवारांनी ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी जातीयवाद केल्याचं महाराष्ट्रात एक उदारण दाखवा, ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलेच नाही, वक्तव्ये केली, त्यांच्या वक्तव्यांवर आपण काय भाष्य करायचं. महाराष्ट्राची जनता शहाणी आहे, त्यांना एकच जागा दिल्याचं शरद पवार म्हणाले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.