Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक अंकशास्त्र, 4 To 10 नोव्हेंबर 2024 : मूलांक 3 निर्णय घेताना प्रॅक्टिकल राहा ! मूलांक 8 आळस सोडा, कामाला लाग ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

12

Weekly Numerology Prediction 4 To 10 November 2024 : मूलांक 1 साठी हा आठवडा तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगती असून सेलिब्रेशनचा शुभयोग जुळून येणार आहे.मूलांक 3 च्या जातकांनी संयमाने वागाने आणि दानधर्म करावा. मूलांक 5 च्या लोकांसाठी प्रवासाचा योग असून त्यात शुभलाभ होणार आहे. मूलांक 7 साठी प्रोजेक्टमध्ये वाढ आणि संपत्तीत वाढ होईल. तसेच मूलांक 9 च्या जातकांचा मानसन्मान वाढणार आहे. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक अंकशास्त्र, 4 To 10 नोव्हेंबर 2024 : मूलांक 3 निर्णय घेताना प्रॅक्टिकल राहा ! मूलांक 8 आळस सोडा, कामाला लाग ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology 4 To 10 November 2024: नोव्हेंबर महिन्यातील हा पहिला आठवडा असून मूलांक 1, मूलांक 2 सह या मूलांकासाठी आठवडा प्रगतीने भरलेला आहे. सेलिब्रेशनचा शुभयोग असून नवीन गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. मूलांक 4 सह या मूलांकासाठी कार्यक्षेत्रात अडचणी असून खर्चात वाढ होणार आहे. चला तर जाणून घेऊया मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): प्रोजेक्ट्स यशाच्या मार्गावर

हा आठवडा तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगती असून सेलिब्रेशनचा शुभयोग जुळून येणार आहे. प्रोजेक्ट्स यशाच्या मार्गावर असून तुमचे सगळीकडे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडी चिंता वाढेल आणि खर्च देखील होवू शकतो. लवलाइफमध्ये संबंध अधिक दृढ होतील. जे अविवाहीत आहेत त्यांच्यासाठी स्थळं येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी घरातील तरूण सदस्यांचे मन उदास राहील.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): नवीन गुंतवणुकीतून मोठा फायदा

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत यश देणारा असून या आठवड्यात कोणत्यातरी नवीन गुंतवणुकीमुळे तुमचा मोठा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्या, उत्तम परिणाम दिसतील. प्रेमसंबंध मजबूत होतील पण काही कारणामुळे मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी सुख आणि समृद्धीचे योग आहेत.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): संयमाने वागा, दानधर्म करा

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे पण तुम्हाला संयमाने वागावे लागेल. दानधर्म करावा त्याचे योग्य फलित मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये वातावरण ठिक आहे. कार्यक्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही खूप जबाबदार कामे कराल आणि घरच्यांच्या भविष्याचा विचार कराल.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): कार्यक्षेत्रात अडचणी, खर्चात वाढ

हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमसंबंधाच्या बाबतीत ठिक आहे. तुमचे नाते अधिक दृढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अडचणी वाढू शकतात आणि तुम्ही हटवादीपणामुळे घेतलेले निर्णय तुमच्या अंगलट येवू शकतात. आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कामात फोकस ठेवा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): प्रवासामुळे शुभलाभाचा योग

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा शुभ असून धन लाभाचे योग आहेत. प्रवासामुळे तुम्हाला शुभलाभ होणार आहे. ऑफिसमध्ये तुम्ही प्रॉमीस केलं असेल किंवा हे काम पूर्ण होईल असं ठामपणे सांगितलं असेल, तर ते पूर्ण होणार नाही. लवलाइफ चांगले आहे. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळणार आहे.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): प्रोजेक्टमध्ये यश, धनलाभाचा योग

हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती करणारा असून मान-सन्मात वाढ होणार आहे. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळेल. धनलाभाचे योग असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे. गुंतवणुकीचा विचार करू शकता. प्रेमसंबध चांगले असून तुम्ही पार्टी मूडमध्ये असाल. आठवड्याच्या शेवटी कोणत्यातरी गोष्टीमुळे तुमचे मन बेचैन राहील.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): प्रोजेक्टमध्ये वाढ, संपत्ती वाढीचा योग

हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्टमध्ये वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये सुखद अनुभव येतील. आर्थिक लाभाचे प्रबळ स्थिती असून धनवाढीसंदर्भात अनेक संधी येतील. व्यवसायात कामाचे नियोजन करा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील. घरातील सदस्या तुम्हाला मदत करतील आणि कुटुंबात वातावरण ठिक असेल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): आळस सोडा, कामाला लागा

हा आठवडा तुमच्यासाठी ओके आहे, पण कामात हलगर्जीपणा करू नका. तुमची धनसंपत्ती वाढेल पण त्यासाठी आळस सोडा आणि कामाला लागा. कार्यक्षेत्रात अडचणी आहेत तसेच प्रोजेक्टमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमात थोडा अहंकार आहे त्यामुळे शाब्दिक खटके उडतील. आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना भविष्याचा विचार आर्वजून करा.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): मानसन्मानात वाढ

हा आठवडा तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रेमजीवनात सुखद अनुभव येतील. ऑफिसमध्ये तुमचा मानसन्मान वाढणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असून धन लाभाचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी कामावर अधिक फोकस ठेवा. प्रॅक्टीकल राहा आणि कोणताही निर्णय घेताना भविष्याचा विचार करा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.