Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य 4 To 10 नोव्हेंबर 2024 : गुरू-शुक्राचे राशीपरिवर्तन ! मिथुन, सिंह सह या 5 राशींचा भाग्योदय, धनसंपत्ती वाढ ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
Weekly Career Horoscope, 4 To 10 November 2024: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि गुरुचे संक्रमण होत असून, या आठवड्यात शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे, तर गुरु आधीच शुक्राच्या राशीत विराजमान असल्यामुळे शुक्र आणि गुरुचा राशी परिवर्तन योग तयार होईल. हे दोन्ही शुभ ग्रह एकत्र आल्यामुळे मेष, मिथुनसह या ५ राशी मालामाल होतील. या राशीचे जातक व्यवसायात प्रगती करतील, धनसंपत्तीत वाढ होईल तसेच प्रवास सुखाचा असेल. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या. तसेच मेष ते मीन पर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते पाहूया, या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य पहा.
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : निर्णय घेताना प्रॅक्टीकल राहा, यश मिळेल
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक बाबतीत प्रॅक्टीकल विचार तुम्हाला लाभ देईल. कुटुंबाकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासात शुभलाभ आहे. लवलाइफ ठिक असून एकमेकांमध्ये संवाद व्यवस्थित ठेवा. तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या विचारांवर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्या तुम्हाला लाभ होईल.
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक खर्चात अचानक वाढ
या आठवड्यात तुमची लवलाइफ चांगली आहे. जीवनात एक नवीन टप्पा सुरु होणार आहे. सकारात्मक विचाराने पुढे जा. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होईल. आर्थिक खर्च अचानक वाढतील त्यामुळे मन अस्वस्थ राहील. तब्येतीची काळजी घ्या, जुनी दुखणी डोकं वर काढू शकतात. या आठवड्यात नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा विचार कराल आणि तुमचा प्रवास यशस्वी होईल. आठवड्याच्या शेवटी जीवनात सुख समृद्धीच्या अनेक संधी मिळतील.
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्टबाबत रिलॅक्स असणार आहात
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला असून कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होणार आहे. प्रोजेक्टबाबत तुम्ही रिलॅक्स असाल. आर्थिक प्रगतीचे योग असून अचानक धनलाभाची बातमी मिळेल. प्रेमसंबंधात थोडा धाडस करून काही निर्णय घेतले तर तुम्ही सुखी राहा. तब्येतीत सुधारणा होणार असून जीवनशैलीत काही बदल कराल. प्रवासात थोडा त्रास आहे त्यामुळे प्रवास टाळावा. प्रियजन आणि नातेवाईकांच्या भेटी होतील. आठवड्याच्या शेवटी झोपेचा त्रास होवू शकतो, योगासन अथवा मेडिटेशन करावे.
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्टमध्ये यश, आर्थिक बाबतीत सुधारणा
कर्क राशीसाठी हा आठवडा ऑफिसच्या कामात प्रगती आणि मान-सन्मानात वाढ होणार आहे. प्रोजेक्टमध्ये यश असून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. गुंतवणुकीचा विचार करू शकता. लवलाइफ चांगले असेल. कुटुंबात काही बाबतीत नाराजी असेल. तब्येतीकडे लक्ष द्या. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी बातमी तुमचे टेन्शन वाढवेल.
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : दस्तऐवज सांभाळून ठेवा
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून प्रवासात यश मिळणार आहे. प्रेमसंबंधात नाते अधिक दृढ होईल. विवाहाचे योग जुळून येणार आहेत. ऑफिसमध्ये दस्तऐवज संदर्भातील कामे करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा अडचणी वाढू शकतात. आठवड्याच्या शेवटी शुभयोग आहेत.
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवीन प्रोजेक्ट मिळणार
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती असून नवीन प्रोजेक्टमुळे तुम्ही आनंदी असाल. तब्येतीत सुधारणा होणार असून पथ्य सांभाळा आणि तपासणी वेळोवेळी करा. कुटुंबात महिलेमुळे सुखद योग जुळून येणार आहेत. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू यश मिळेल. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : धनलाभाचा योग, गुंतवणुकितून फायदा
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून गुंतवणुकिमुळे तुम्हाला उत्तम फायदा होणार आहे. धनलाभाचे योग असून ऑफिसमध्ये चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव येतील. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळेल तिथे तुमचे कलाकौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात एखाद्या महिलेमुळे समस्या येवू शकते. तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात कोणताही निर्णय घेताना प्रॅक्टिकल राहा. आठवड्याच्या शेवटी प्रवास असून त्यात अडचणी आहेत तसेच मन अस्वस्थ राहील.
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवास सुखाचा, धनलाभाचे योग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती असून आर्थिक बाबतीत धन लाभाची उत्तम स्थिती निर्माण होते आहे. लवलाइफ चांगले असून प्रेमात बहार येईल. प्रवासा सुखद अनुभव आणि जुन्या आठवणी ताज्या होतील. तब्येतीची काळजी घ्या. काही कारणामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत दुरावा होवू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल असेल तसेच सुख समृद्धीचे शुभ योग जुळून येतील.
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : खर्च वाढणार, नवीन गोष्ट शिकणार
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगल असून ऑफिस आणि व्यवसायात तुमची उत्तम प्रगती होणार आहे. एखाद्या भारदस्त व्यक्तीमत्वासोबत तुमची भेट होईल, त्याची मदत तुम्हाला भविष्यात तुम्हाला लाभदायक ठरेल. प्रवास सुखाचा असेल तसेच आर्थिक बाबतीत मुलांवर खर्च जास्त होणार आहे. आळस थोडा वाढेल, तो झटकून कामाला लागा. लवलाइफ ठिक असेल. या आठवड्यात काहीतरी नवीन शिकणार आहात. आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना प्रॅक्टिकल राहा, सफलता मिळेल.
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : तडकाफडकी निर्णय घेवू नका
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून आर्थिक बाबतीत सुधारणा करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होईल. लवलाइफमध्ये अहंकार आल्यामुळे समस्या येवू शकते. तडकाफडकी निर्णय घेवू नका, शांतपण घेतलेले निर्णय सफलता देतील. तब्येतीची काळजी घ्या, जुने आजार डोके वर काढतील. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एकदम रिलॅक्स फिल करणार आहात.
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : मानसन्मानात वाढ, दानधर्म करणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात चांगले-वाईट अनुभव देणारा आहे. सुख समृद्धीचे योग असून तुमचा मानसन्मान वाढणार आहे. दानधर्म करणार आहात त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. तब्येतीत सुधारणा होणार आहे. कुटुंबात काही बदल होतील जे तुमच्यासाठी सकारात्मक असतील. प्रवासात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक गुरुंचे आशीर्वाद मिळतील. आठवड्याच्या शेवटी प्रोजेक्टमुळे ताण वाढणार आहे.
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्ट यशस्वी, धनलाभाचा योग
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून लवलाइफ उत्तम आहे. जीवनात सुख समृद्धीचे शुभ योग असून, आर्थिक बाबतीत नेटवर्किंगमुळे धनलाभाचे योग आहेत. या आठवड्यात प्रवासामुळे यश आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कार्यक्षेत्रात चढउतार असतील पण ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे प्रोजेक्ट यशस्वी होतील. कुटुंबात थोडी अस्वस्थता असेल. तब्येतीची काळजी घ्या आणि आठवड्याच्या शेवटी सेलिब्रेशनचा शुभयोग आहे.