Sanjay Raut News: ”फडणवीसांची सुरक्षा अचानक वाढवली, राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा त्यांनी स्वतःच वाढवली. राज्याचे गृहमंत्री स्वतःच सुरक्षित नाहीत, महाराष्ट्राला चिंता वाटते. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही”.
हायलाइट्स:
- महेश सावंत होतील इतक्या मतांनी विजयी
- संजय राऊतांनी आकडाच सांगितला
- राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते
”सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी भाजप नेते कोणत्या भाषेत बोलले होते, ते जरा चेक करा. भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला होता. त्यावेळी आक्षेप घेतला गेला नाही. आता शायना एन.सी. यांच्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला त्याचा अर्थ बाहेरुन आयात केलेला व्यक्ती असा आहे. त्या स्थानिक उमदेवार नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी केलेलं वक्तव्य गंभीर नाही. अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे”, असं संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे होणाऱ्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
”बाळासाहेब आंबेडकरांत्या प्रकृतीचे आम्हाला चिंता आहे. त्यांचे विधान सत्तेवर आधारित नाही आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. भ्रम निर्माण करणारी वक्तव्य त्करू नये, छातीवर ताण येणारे वक्तव्य त्यांनी करू नये. त्यांनी जास्त बोलू नये गेले सात आठ दिवस त्यांनी कमी बोलावे असा वैद्यकीय सल्ला असतो त्यांनी त्यांची प्रकृती सांभाळून महाराष्ट्र आम्ही सांभाळतो”, असं देखील संजय राऊत म्हणाले.