Singham Again Box Office: रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ उडवून दिला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला थोडे कमी प्रेक्षक मिळाले पण तरीही दमदार कमाई केली.
हायलाइट्स:
- ‘सिंघम अगेन’ने दुस-या दिवशी चांगली कमाई केली
- चित्रपटाने अंदाजे ४१.५ कोटी रुपयांची कमाई केली.
- ‘सिंघम अगेन’ जगभरातील २००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे
‘भूल भुलैया ३’ शी स्पर्धा
दरम्यान, ‘भूल भुलैया ३’ देखील उत्तम कामगिरी करत असून तो हिट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही सिनेमांना त्यांचे स्थान टिकवून ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. सोमवारच्या कलेक्शननंतरच हा चित्रपट भविष्यात काय कामगिरी करेल हे समजेल.
जगभरातील अनेक स्क्रीनवर रिलीजचा फायदा
‘सिंघम अगेन’ जगभरातील २००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे, ज्याचा त्यांना भरपूर फायदा मिळतोय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्ये १९७ स्क्रीन, उत्तर अमेरिकेत ७६० हून अधिक स्क्रीन, यूके आणि आयर्लंडमध्ये २२४ स्क्रीन मिळाल्या. या रिलीजचा चित्रपटाला खूप फायदा होत आहे.
Rohit Shetty चा धमाका, सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, दुसऱ्याच दिवशी १०० कोटी पार
‘सिंघम अगेन’ची कास्ट
‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या पोलीस फोर्स सिनेमांचा एक भाग आहे, या सिनेमात सूर्यवंशी आणि सिंबा या पात्रांचाही समावेश आहे. यात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ, श्वेता तिवारी आणि अर्जुन कपूर या कलाकारांचा समावेश आहे.