“योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांचाही बाबा सिद्दीकी होईल”

UP CM Yodi Adityanath Marathi News : उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाहीतर त्यांचाही बाबा सिद्दीकी करू, असं म्हटलं आहे. कोणी दिली धमकी जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाहीतर त्यांचाही बाबा सिद्दीकी केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरवरून हा मेसेज केला गेला असून पोलीस धमकी देणाऱ्याच्या तपास करत आहेत. नेमका कोणी मेसेज केला याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या धमकीच्या मेसेजनंतर योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांचा बाबा सिद्दीकी करू असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला वांद्रे पूर्व येथे तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई असल्याचं समोर आलं होतं. त्यासोबतच या प्रकरणात पोलिसांनी ८ ते ९ जणांना अटक केली असून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला एक महिनाही झाला नसताना थेट योगींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता धमकी देणाऱ्याचा सिद्दीकींच्या हत्येशी काही संबंध आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधी मार्च महिन्यामध्ये लखनऊमधील महानगर येथील नियंत्रण कक्षामध्ये योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. रात्रीच्या वेळी दहा वाजता ८८८९९९१९१६ या नंबरवरून धमकीचा फोन आला होता. योगींना बॉम्बने उडवलं जाईल, असं धमकी देणाऱ्याने फोन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला म्हटलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारलं कोण बोलत आहे तर समोरून फोन ठेवण्यात आला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेल, फोन आणि मेसेज वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. दोन आठवड्यांमध्ये जवळपास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमक्या आल्या आहेत. मात्र सुरक्षा यंत्रणांनी या धमक्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

up cm yogi mumabi threatup cm yogi threatYogi Adityanathयोगी आदित्यनाथयोगी आदित्यनाथ धमकीयोगी आदित्यनाथ मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment