राज ठाकरेंची दोन विधानं शिंदेंना खटकली; माहीममधून माघार न घेण्यावर ठाम, आता थेट आर या पार

विधानसभा निवडणुकीसाठी भरण्यात आलेले अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महायुतीत माहीमच्या जागेवर निर्माण झालेला तिढा कायम आहे. शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर माहीममधून लढण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्याची परतफेड म्हणून अमित यांच्या विरोधात महायुतीनं उमेदवार देऊ नये अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. सरवणकरांनी माघार घ्यावी यासाठी शिंदेंनी सुरुवातीला प्रयत्न केले. पण त्यानंतर त्यांचा सूर बदलला आहे. सरवणकर यांनी माघार घेऊ नये यासाठी आता मुख्यमंत्रीच जोर लावत असल्याचं चित्र आहे.
Nawab Malik: त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास अजितदादा…; मलिकांचं महत्त्वाचं भाकीत, NCP कोणत्या विचारात?
‘मी राज ठाकरेंसोबत निवडणूक रणनीतीबद्दल चर्चा केली होती. त्यावर आधी महायुतीमधील तीन पक्षांचं काय ते ठरु दे, असं उत्तर त्यांनी दिलं. मग त्यांनी अचानक त्यांचे उमेदवारच घोषित केले. मी सरवणकर यांच्याशी याबद्दल बोललो. शिवसैनिक आणि नेत्यांचं ऐकायला हवं असं मला वाटतं. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होता कामा नये,’ अशा शब्दांत शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली.
Eknath Shinde: भाजपचा दबाव, तरीही शिंदेंचा आमदार लढण्यावर ठाम; भाई मोठ्या भावाला इतके का भिडताहेत? ५ मुद्दे
सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी शिंदेंनी सुरुवातीला प्रयत्न केले. पण गेल्याच आठवड्यात राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेलं एक विधान शिंदेंना खटकलं. पुढील मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राज म्हणाले होते. राज यांच्या विधानामुळे भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चाहूल शिंदेंना लागली. भाजपच्या मागणीवरुन शिवसेनेनं आपली हक्काची जागा मनसेसाठी का सोडायची, असा विचार पक्षात झाला. त्यामुळे आता सरवणकर यांच्या पाठोपाठ शिंदेही माहीमबद्दल ठाम आहेत.

राज ठाकरेंची दोन विधानं शिंदेंना खटकली; माहीममधून माघार न घेण्यावर ठाम, आता थेट आर या पार

राज ठाकरेंनी मुलाखतीत केलेलं आणखी एक विधान शिंदेंना खटकलं. माझ्या पक्षाला मिळालेलं निवडणूक चिन्ह मतदारांनी मतदान केल्यानं मिळालेलं आहे. ते मी ढापलेलं नाही. मतदारांच्या आशीर्वादातून ते चिन्ह मिळालं आहे. कोर्टानं ते चिन्ह मला दिलेलं नाही, अशा शब्दांत राज यांनी टोलेबाजी केली होती. त्यांनी नाव न घेता केलेली टीका मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागली.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpDevendra Fadnavismaharashtra assembly electionMaharashtra politicsअमित ठाकरेएकनाथ शिंदेमनसेमहाराष्ट्र राजकीय बातम्याराज ठाकरेसदा सरवणकर
Comments (0)
Add Comment