जरांगेंनी दंड थोपटले, ओबीसी नेत्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘१३५ आमदार पाडण्याचं काय झालं?’

Laxman Hake on Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर राज्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीकास्त्र डागले आहे.

Lipi

अभिजीत दराडे, पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगेंच्या मराठा उमेदवारांची फौज आता मैदानात उतरणार आहेत. पत्रकार परिषदेत घेत त्यांनी कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आणि कोणत्या मतदारसंघात प्रस्थापितांचे उमेदवार पाडायचे हे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीकास्त्र डागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मनोज जरांगे आज औकातीवर आले आहेत. एक मराठा लाख मराठा हे मतांचे मूल्य नसतेच मुळी,’ अशी टीका केली. तर हाकेंनी जरांगे पाटलांसमोर एक सवालही उपस्थित केला आहे. ‘१३५ आमदार पाडणार होते तुम्ही? काय झालं त्याचं,’ पवारांनी यांना डाफरले आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
मनोज जरांगेंच्या निर्णयाने महायुतीत चलबिचल! संतोष बांगरांचे टेन्शन वाढले, ताफा आंतरवालीत धडकणार
‘जरांगे कसले बाँड पेपर घेऊन तुम्ही बसले आहेत? तुम्ही शिलालेखावर लिहून घ्या हे लोक कुठल्याच गोष्टीवर ठाम नाहीत’ अशा शब्दांत ताशेरे ओढून हाके पुढे म्हणाले, मनोज जरांगे सुपारी घेऊन ते तुतारी वाजवणार आहेत. ते बारामतील मॅनेज झाले आहेत. तर जरांगे यांच्यामागे दलित आणि मुस्लीम समाज कसा जाणार?

यातच हाकेंनी उमेदवारी मागे घेण्यासाठी एक दिवस राहिला असल्याने जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागले आहे. ‘जरांगे नावाचे वटवागूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलं आहे, ते उद्या ३ नंतर इतिहास जमा होईल’ असे मोठे विधान हाकेंनी केले. यावर आता मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. तत्पूर्वी जरांगेंनी राजकीय आखाड्यात उमेदवार उतरवल्याने महायुतीत मात्र चलबिचल सुरु झाली आहे. जरांगेंच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय स्थितीवर कसा परिणाम होणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

laxman hakemanoj jarange patilmaratha candidates in Maharashtramh vidhan sabha nivadnukOBC statement on maratha candidateओबीसींचे मराठा उमेदवारांवर विधानमनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणारमहाराष्ट्र विधासभेतील मोठ्या लढतीमहाराष्ट्रातील मराठा उमेदवारलक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया
Comments (0)
Add Comment