Shiv Sena Office Bearers Returned To Eknath Shine Group : विधानसभा जागावाटपावरुन नाराज असलेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपने मनधरणी केल्यानंतर आता पुन्हा त्यांनी शिंदे सेनेत घरवापसी केली आहे.
महानगरपालिकेच्या वाटाघाटी
शिवसेनेचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं, आगामी काळात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला महायुतीत अधिकच्या जागा देऊ असा शब्द दिला होता. छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात गेलेल्यांनी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेत छत्रपती संभाजीराजेंना धक्का दिला आहे. शिंदे सेनेचे पदाधिकारी मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्ही भगव्याखाली आलो आहोत. जर कोणत्याही शिवसैनिकाचं मन दुखावलं असेल, तर क्षमा असावी.
महायुतीला पाठिंबा दिल्याची माहिती
सोलापूरच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख, भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सोबत येत, आम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याची महिती दिली. छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला सोलापुरात उभारी मिळेल का असं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु ऐनवेळी स्वराज्य पक्षाला धक्का देत, शिंदेंच्या शिवसैनिकांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
Solapur News : आधी बंडखोरी, नंतर भाजपकडून मनधरणी, आता घरवापसी; छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात गेलेले पुन्हा शिंदे सेनेत
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उबाठा गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. माजी आमदार सोपल यांनी जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला पाठिंबा दिला आहे. बार्शीत झालेल्या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची राजकीय उत्सुकता होती, शिवाय दोघांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती.