Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी बंडखोरी, नंतर भाजपकडून मनधरणी, आता घरवापसी; छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात गेलेले पुन्हा शिंदे सेनेत

6

Shiv Sena Office Bearers Returned To Eknath Shine Group : विधानसभा जागावाटपावरुन नाराज असलेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपने मनधरणी केल्यानंतर आता पुन्हा त्यांनी शिंदे सेनेत घरवापसी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इरफान शेख, सोलापूर : विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन नाराज झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अखेर घरवापसी झाली आहे. सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत बंड पुकारून महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करत महायुतीत पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. शिंदेंसेनेमधील पदाधिकारी अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांनी माध्यमांसमोर येऊन महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
Solapur News : मनोज जरांगेंचा एमडीएम फॅक्टर चालणार? ते किंगमेकर नव्हे, तर किंगच; मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया

महानगरपालिकेच्या वाटाघाटी

शिवसेनेचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं, आगामी काळात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला महायुतीत अधिकच्या जागा देऊ असा शब्द दिला होता. छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात गेलेल्यांनी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेत छत्रपती संभाजीराजेंना धक्का दिला आहे. शिंदे सेनेचे पदाधिकारी मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्ही भगव्याखाली आलो आहोत. जर कोणत्याही शिवसैनिकाचं मन दुखावलं असेल, तर क्षमा असावी.
Solapur News : उबाठा गटाच्या उमेदवाराची मनोज जरांगेंशी भेट, बार्शीतील राजकीय समीकरणं बदलतील? चर्चांना उधाण

महायुतीला पाठिंबा दिल्याची माहिती

सोलापूरच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख, भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सोबत येत, आम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याची महिती दिली. छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला सोलापुरात उभारी मिळेल का असं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु ऐनवेळी स्वराज्य पक्षाला धक्का देत, शिंदेंच्या शिवसैनिकांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

Solapur News : आधी बंडखोरी, नंतर भाजपकडून मनधरणी, आता घरवापसी; छत्रपती संभाजी राजेंच्या पक्षात गेलेले पुन्हा शिंदे सेनेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उबाठा गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. माजी आमदार सोपल यांनी जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला पाठिंबा दिला आहे. बार्शीत झालेल्या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची राजकीय उत्सुकता होती, शिवाय दोघांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.